बाप रे! सात महिन्यात १४१ मेट्रीक टन 'बायोमेडिकल वेस्ट'

141 metric ton biomedical waste produced in nashik marathi news
141 metric ton biomedical waste produced in nashik marathi news

नाशिक : कोरोना संसर्गामुळे पालिकेसह खासगी रुग्णालये फुल्ल झाल्यानंतर कमी जोखमीच्या कोरोना रुग्णांना घरातचं उपचार सुरु करण्यात आले होते. त्यामुळे घरांमधून घनकचयाबरोबरच प्रथमच बायोमेडिकल वेस्ट येण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून सात महिन्यात तब्बल १४१ मेट्रीक टन बायोमेडिकल वेस्ट बाहेर पडल्याची धक्कादायक बाब समोर आली असून पालिकेच्या इतिहासात प्रथमच हा प्रकार घडला आहे. 

प्रतिबंधित क्षेत्राचे नियम बदलले

एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंद नगर भागात आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. मे अखेर पर्यंत शहरात कोरोनाची परिस्थिती निंयत्रणात होती त्यानंतर मात्र मागच्या महिन्याचे विक्रम मोडीत निघत गेले. ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात हजारांच्या पटीने रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असला तरी महापालिकेने मार्च महिन्यापासूनच रुग्णसज्जता करताना तपासण्या सुरु केल्या होत्या. एप्रिल महिन्यात कोरोना बाधित आढळल्यानंतर बाधिताच्या घरापासून तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला त्यानंतर जशी रुग्ण संख्या वाढत गेली त्याप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्राचे नियम देखील बदलत गेले. इमारत व त्यानंतर एका खोली पुरते प्रतिबंधित क्षेत्र झाले.

आरोग्य विभागाकडून वेस्ट संकलित केले जाते

विषाणुंचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील म्हणजेच होम कोरांटाईन व्यक्तीच्या घरातून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बायोमेडीकल वेस्ट संकलित केले जाते त्यानुसार मार्च अखेर पासून ते २६ सप्टेंबर पर्यंत १४१.२४९ मेट्रीक टन बायोमेडिकल जमा करण्यात आले आहे. पीपीई किट, गोळ्या व औषधांचे रॅपर आदींचा समावेश या वस्तुंमध्ये आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या पन्नास हजारी पार केली आहे तर २०७६ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत. सध्या तीन हजारांपेक्षा अधिक ॲक्टीव्ह पेशंट आहेत. 

असे बाहेर पडले बायोमेडिकल वेस्ट 
महिना किलो मेट्रीक टन 
मार्च ३५     ०.०३५ 
एप्रिल २,८९९    २.८९९ 
मे २,४२५       २.४२५ 
जून ६,९६०     ६.९६ 
जुलै २१,३५०    २१.३५ 
ऑगष्ट ५५,७६५   ५५.७६५ 
सप्टेंबर ५१,८४५    ५१.८४५ 
 
एकुण १,४१,२७९ १४१.२४९ 

संपादन - रोहित कणसे


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com