नाशिक जिल्ह्यात आज १९७ पॉझिटिव्ह, बरे झाले २७८

अरुण मलाणी
Monday, 11 January 2021

नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या अधिक राहिल्याने उपचार घेत असलेल्‍या रुग्ण संख्येत घट झाली आहे. सोमवारी (ता.११) दिवसभरात १९७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या २७८ इतकी होती

नाशिक : नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या अधिक राहिल्याने उपचार घेत असलेल्‍या रुग्ण संख्येत घट झाली आहे. सोमवारी (ता.११) दिवसभरात १९७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, बरे झालेल्‍या रुग्णांची संख्या २७८ इतकी होती. दोन रुग्णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्ण संख्येत ८३ ने घट झाली असून, सद्यःस्थितीत जिल्ह्यात १ हजार ५८९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बाधितांमध्ये नाशिक शहरातील १३२

सोमवारी (ता.११) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १३२, नाशिक ग्रामीणमधील ५१, मालेगाव महापालिका हद्दीतील १०, जिल्‍हाबाहेरील चार रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील १८२, नाशिक ग्रामीणमधील ७३, मालेगावचे १५ तर जिल्‍हा बाहेरील आठ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दोन मृतांमध्ये एक नाशिक शहरातील असून, अन्‍य एक रुग्ण नाशिक ग्रामीण भागातील आहे. दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्णालये व गृहविलगीकरणात १ हजार ०६३, नाशिक ग्रामीणला ३९, मालेगावला एक, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात तीन, जिल्‍हा रुग्णालयात सात संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

एकूण संख्या १ लाख १२ हजार ६७५ वर

दरम्‍यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ६७५ वर पोहोचली असून, यापैकी १ लाख ९ हजार ७३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आत्तापर्यंत २ हजार १३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत १ हजार ६२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 197 new corona patients found in nashik district marathi news