'वसाका' वाहतूकदारांना दोन कोटींचा धनादेश; गळीत हंगामाची तयारी जोरात

मोठाभाऊ पगार
Tuesday, 22 September 2020

वसाका कारखाना धाराशिव उद्योगसमूहाला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला असून, दरम्यानच्या काळात कारखाना बंद होता; परंतु आता सर्व गोष्टी जुळून आल्याने गळीत हंगामाची जोरात तयारी सुरू झाली आहे.

नाशिक/देवळा : धाराशिव साखर कारखाना युनिट २ संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखानाच्या व्यवस्थापनाकडून २०२१-२२ मधील गळीत हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. शनिवारी (ता. १९) ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांना पहिल्या हप्त्यात दोन कोटी रुपयांचे धनादेशवाटप करत वाहनांची करारनोंदणी केली. 

गळीत हंगामाची तयारी

वसाका कारखाना धाराशिव उद्योगसमूहाला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला असून, दरम्यानच्या काळात कारखाना बंद होता; परंतु आता सर्व गोष्टी जुळून आल्याने गळीत हंगामाची जोरात तयारी सुरू झाली आहे. १० सप्टेंबरपासून बहुतांश कामगार कामावर रुजू झाले असून, सर्व दृष्टीने कामकाजाला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऊसतोड मजुरांचा करार व अंतिम मसुदा तयार करत साखळी पद्धतीने एकमेकांना जामीन राहत ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार यांच्याशी करार केला.

हेही वाचा > अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

इतक्या वाहनांची करारात नोंद

त्या करारा अंतर्गत वसाका व्यवस्थापनाने जवळपास ९० ते ९५ वाहतूक ठेकेदारांना दोन कोटी रुपयांची उचल दिली. त्यात २५५ ट्रक व ट्रॅक्टर, १२० लहान ट्रॅक्टर, ७५ बैलगाडी इतक्या वाहनांची या करारात नोंद झाली. लवकरच दुसरा हप्ताही दिला जाणार असल्याची माहिती धाराशिव उद्योगसमूहाचे कार्यकारी संचालक अमर पाटील, आबासाहेब खारे यांनी दिली. या वेळी धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे, सुरेश सावंत, संतोष कांबळे, संजय खरात, संदिपान खारे, सुहास शिंदे, सरव्यवस्थापक हनुमंतराव पाटील, युनियन अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, शेतकी अधिकारी सुधाकर साळुंखे, ऊस विकास अधिकारी तुषार कापडणीस आदी पदाधिकारी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 crore check to transporters by Vasantdada Sugar Factory nashik marathi news