जिल्ह्यात २ हजार ९३५ बाधितांवर उपचार सुरु; ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण ३ हजारांच्‍या आत 

अरुण मलाणी
Friday, 6 November 2020

जिल्‍ह्‍यात एकूण २ हजार ९३५ बाधित सध्या उपचार घेत आहेत. शुक्रवारी (ता.६) दिवसभरात २४९ बाधित आढळले असतांना, ४७३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून सात रूग्‍णांचा मृत्‍यू झाला. 

नाशिक : कोरोना बाधितांची घटती संख्या आणि बरे होणार्या रूग्‍णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत जिल्‍ह्‍यात सातत्‍याने घट होते आहे. यातून जिल्‍ह्‍यात सध्या उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या तीन हजारांच्‍या आत आलेली आहे. जिल्‍ह्‍यात एकूण २ हजार ९३५ बाधित सध्या उपचार घेत आहेत. शुक्रवारी (ता.६) दिवसभरात २४९ बाधित आढळले असतांना, ४७३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून सात रूग्‍णांचा मृत्‍यू झाला. 

२ हजार ०४२ रूग्‍ण नाशिक शहरात

सध्या उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांपैकी सर्वाधिक २ हजार ०४२ रूग्‍ण नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. तर नाशिक ग्रामीण भागातील ७६४, मालेगाव महापालिका हद्दीतील १२२ तर जिल्‍हाबाह्य सात कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १४७, नाशिक ग्रामीणमधील ९१, मालेगावचे ८, जिल्‍हाबाह्य तीन बाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील २६०, नाशिक ग्रामीणचे २०४, मालेगावचे सहा तर जिल्‍हाबाह्य तीन रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. सात रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला असून, यापैकी तीन नाशिक शहरातील, तीन नाशिक ग्रामीणचे तर मालेगाव येथील एका रूग्‍णाचा मृत्‍यू झालेला आहे. 

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज

९० हजार ४७९ रूग्‍णांनी कोरोनावर मात

जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९५ हजार ११० झाली असून, यापैकी ९० हजार ४७९ रूग्‍णांनी कोरोनावर मात केलेली आहे. १ हजार ६९६ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ५७५, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २९, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ६, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक तर जिल्‍हा रूग्‍णालयात सहा रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ५९१ अहवाल प्रलंबित होते, यापैकी २६३ नाशिक ग्रामीणचे तर २६० नाशिक शहरातील रूग्ण आहेत. 

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 thousand 935 patients are undergoing treatment in the district nashik marathi news