BIG BREAKING : धक्कादायक! कोरोनामुळे २० वर्षीय गर्भवतीचा मृत्यु..नाशिक शहरात पहिला बळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

बजरंग वाडीत राहणारी 20 वर्षीय महिला गेल्या 24 एप्रिल रोजी पोटात दुखत असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी तिला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ती गेल्या 2 मे रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आली. त्यावेळी तिला पोटात दुखणे आणि श्वास घेण्यासह रक्तदाबाचाही त्रास सुरू झाला होता.

नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तिचा कोरोनाचा रिपोर्ट मंगळवारी (ता.5) सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. नाशिकरोड समाज कल्याण कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बजरंग वाडीतील ती रहिवाशी होती. शहरातील कोरोनाचा हा पहिला तर जिल्ह्यातील 13  बळी गेले आहेत

गर्भवतीचा मृत्यू : रक्तदाब व प्रसव वेदनांमुळे झाली होती दाखल

बजरंग वाडीत राहणारी 20 वर्षीय महिला गेल्या 24 एप्रिल रोजी पोटात दुखत असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी तिला जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र ती गेल्या 2 मे रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आली. त्यावेळी तिला पोटात दुखणे आणि श्वास घेण्यासह रक्तदाबाचाही त्रास सुरू झाला होता. तिला प्रसूती विभागात दाखल केले असता प्रसूती काळात रक्तदाब वाढतो म्हणून तो नियंत्रित करण्यासाठी उपचार सुरू केले. तसेच श्वास घेण्याचाही त्रास असल्याने तिचे कोरोना चाचणीसाठी स्वब घेण्यात आले होते. 2 मे रोजीच सकाळी साडेसात-आठ वाजेच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

कोरोनाची लागण कशी झाली याबाबत निश्चित माहिती नाही
दरम्यान मंगळवारी (ता5) सकाळी तिचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र तिची कोणतीही प्रवासाची माहिती नाही. त्यामुळे तिला कोरोनाची लागण कशी झाली याबाबत निश्चित कोणतीही माहिती नाही. मात्र तिच्या मृत्यूमुळे शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 कोरोनाचे बळी असून यात 12 जण मालेगावातील आहेत.

हेही वाचा > ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 years old pregnant woman died of corona virus nashik marathi news