उत्तर महाराष्ट्रात २५० शेतकरी आत्महत्या; ७८ शेतकरी मदतीस पात्र

हर्षवर्धन बोऱ्हाडे
Friday, 9 October 2020

अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करताना सावकारी, सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक सामाजिक अडचणी, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत.

नाशिक : जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत २५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील शासकीय मदतीला ७८ शेतकरी पात्र ठरले असून, ९८ शेतकरी अपात्र आहेत. ७४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची चौकशी बाकी आहे. 

अस्मानी आणि सुलतानी संकटाशी सामना करताना सावकारी, सोसायट्यांचे कर्ज, कौटुंबिक सामाजिक अडचणी, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. आत्महत्या केलेल्या २५० शेतकऱ्यांपैकी ९८ शेतकरी मदतीसाठी अपात्र ठरले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यासाठी जलद कार्यवाही सुरू केली असली तरी त्यामुळे ही कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. विभागात २०१५ पासून आजपर्यंत आत्महत्या केलेल्या दोन हजार ३३८ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. नाशिक ९, धुळे १३, नंदुरबार ३, जळगाव २०, नगर ५३ याप्रमाणे ९८ शेतकरी कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरले आहेत.  

 हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 250 farmers commit suicide in North Maharashtra nashik marathi news