नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 374 रुग्ण कोरोनामुक्‍त, सहा रूग्णांचा मृत्यू

अरुण मलाणी
Thursday, 5 November 2020

गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांपैकी नाशिक शहरातील 172, नाशिक ग्रामीणचे 60, मालेगावचे 6 तर जिल्हाबाह्य दोन कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्ह्यातील बरे झालेल्या रूग्णांची संख्या नव्वद हजाराहून अधिक झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 94 हजार 861 कोरोना बाधित आढळून आले असतांना, यापैकी 90 हजार 006 रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. गुरूवारी (ता.5) दिवसभरात 240 बाधित आढळून आले असतांना, 374 रूग्णांनी कोरोनावर मात केली. सहा रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.

नाशिक शहरातील 172 बाधित

गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांपैकी नाशिक शहरातील 172, नाशिक ग्रामीणचे 60, मालेगावचे 6 तर जिल्हाबाह्य दोन कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोना बाधित झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 251, नाशिक ग्रामीणमधील 116, मालेगावचे चार तर जिल्हाबाह्य तीन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सहा मृतांमध्ये नाशिक शहरातील एक, मालेगाव महापालिका हद्दीतील एक तर नाशिक ग्रामीण भागातील चार रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा >  काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

90 हजार 006 बाधितांनी कोरोनावर मात

आतापर्यंत जिल्ह्यात 94 हजार 861 बाधित आढळून आले असून, यापैकी 90 हजार 006 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 हजार 689 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 3 हजार 166 बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 709, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 39, मालेगाव महापालिका हद्द व गृहविलगीकरणात 2, जिल्हा रूग्णालयात पाच रूग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत 728 रूग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी 357 रूग्ण नाशिक ग्रामीण भागातील आहेत. 

हेही वाचा >  एक हात बिबट्याच्या जबड्यात, तरीही चिमुकला थेट भिडलाच; 12 वर्षांच्या गौरवची धाडसी झुंज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 374 corona patients recovered in nashik district marathi news