ऑनलाइन रोजगार मेळाव्यात 529 पदांसाठी 4 हजार अर्ज?...अन् निवड मात्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

लॉकडाऊन कालावधीत कामगार स्थलांतरामुळे निर्माण परिस्थितीत औद्योगिक आस्थापनांची मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांकडे महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केली होती. यासाठी घेतलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

नाशिक : येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पाच दिवसीय ऑनलाइन रोजगार मेळावा घेण्यात आला. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात पाच विविध कंपन्यांकडून 529 रिक्‍तपदे उपलब्ध करून दिलेले होते. त्यासाठी 4 हजार 107 उमेदवारांनी ऑनलाइन स्वरूपात अर्जदेखील दाखल केले.

उमेदवारांना रोजगाराच्या संधी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासुन बंद असलेले कंपन्या, औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उदयोग पूर्वपदावर येत आहेत. कोरोना साथरोगामुळे लॉकडाऊन कालावधीत कामगार स्थलांतरामुळे निर्माण परिस्थितीत औद्योगिक आस्थापनांची मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांकडे महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणीकृत उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केली होती. यासाठी घेतलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. शासनाचा कोणताही निधी खर्च न होता आणि कोणतीही नवीन प्रणाली विकसन न करता उपलब्ध असलेल्या संगणक प्रणालीचा नाविण्यतेने उपयोग करीत रोजगाराच्या संधी बेरोजगारांना उपलब्ध होत आहे.

अशी झाली निवड प्रक्रिया

गेल्या 22 ते 26 जून दरम्यान महास्वयंम वेबपोर्टल प्रणालीचा नाविण्यपूर्वक उपयोग करून ऑनलाईन पध्दतीने दुसरा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. गेल्या शुक्रवार (ता.26) अखेर नियोक्‍त्यांनी मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्स अशा विविध माध्यमांतून पात्र 414 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, अद्यापही काहींच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यातून 104 उमेदवारांची प्राथमिक निवड केली असून 56 उमेदवारांची अंतिम निवड केली आहे. यापैकी 16 उमेदवार प्रत्यक्ष कामावर रूजूही झाले आहेत.

उपक्रम राज्यभरात अंबलबजावणीच्या सुचना

लॉकडाउन कालावधित नाशिक जिल्हा कार्यालयाने केलेल्या या नाविन्यपुर्ण उपक्रमाचे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे मंत्री नवाब मलिक आणि आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी अभिनंदन करतांना उपक्रमाची राज्यभरात अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रोजगार मेळाव्यात झालेल्या प्राथमिक निवडीबद्दलचा तपशील दिला आहे. यात पुण्यातील बीएसए कार्पोरेशन लि. येथील निम ट्रेनीच्या 200 पदांसाठी 595 अर्ज प्राप्त झाले होते. अद्याप मुलाखत प्रक्रिया प्रलंबित आहे.

या कंपन्यांचा होता सहभाग

नाशिकच्या डब्लूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यातर्फे असोसिएट ओपीएसच्या 50 जागा, टाईपिस्ट पदाच्या 50 अशा एकूण शंभर जागांसाठी 1 हजार 071 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 14 उमेदवारांच्या मुलाखती घेत चौघांची प्राथमिक निवड केली. अंबडच्या महिंद्रा ईपीसी इरिगेशन लि. यांच्यातर्फे ईपीपी ट्रेनी पदाच्या 20 जागांसाठी 302 अर्ज आले होते. कंपनीतर्फे 25 उमेदवारांच्या मुलाखती घेतांना 15 जणांची प्राथमिक निवड करतांना 13 जणांची अंतीम निवड केली. शिव इंटरप्राईजेस प्रा. लि. यांच्यातर्फे सीएनसी ऑपरेटर पदासाठी चार जागांसाठी व वेल्डर अरे आग्रोनी पदाच्या 40, फिटरच्या 25, मोड्यूलरच्या 10, टिप्पर ड्रायव्हरपदाच्या 40, एक्‍झावटर ऑपरेटरच्या 20, रोलर ऑपरेटरच्या पाच, ग्रॅडर ऑपरेटरच्या पाच, क्रेशर ऑपरेटरच्या पाच, चालक 10, मदतनिस 20 अशा एकूण 195 जागांसाठी तब्बल 2 हजार 075 ऑनलाइन अर्ज आले होते. यातून 375 उमेदवारांच्या मुलाखतींतून 90 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. नंतरच्या टप्यात 36 उमेदवारांची अंतीम निवड केली.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

पुण्यातील टायसिया बिल्डींग प्रोडक्‍ट प्रा. लि. यांच्यातर्फे फिटर सहा, वेल्डरपदाच्या चार, सुतार 4 अशा एकूण चौदा पदांसाठी 24 अर्ज आले होते. दहा उमेदवारांच्या मुलाखती घेत या सर्वांची प्राथमिक निवड करण्यात आली. विविध कंपन्यांतर्फे एकूण 529 पदासाठी 414 उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या असून, एकूण 119 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. अद्यापदी प्रतिसाद नोंदविलेल्या उमेदवाराच्या व्हिडीओ कॉन्फरन्स आणि मोबाईल दूरध्वनीद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्याची व निवडीची प्रक्रिया सुरू आहे. रोजगार मेळाव्याचे संयोजन नाशिक कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनिल सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्‍त संपत चाटे यांच्यासह संदीप गायकवाड, अख्तर तडवी, महेंद्र महाले यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4,000 applications for 529 posts in online job fair? nashik marathi news