ग्रामपंचायत निवडणुका : जिल्ह्यात ४०४ उमेदवारी अर्ज अवैध; तर १६ हजार ६०२ उमेदवार पात्र

विनोद बेदरकर
Saturday, 2 January 2021

येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, छाननीत आदिवासी इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर व देवळा (१) हे तालुके वगळता इतर सगळ्याच तालुक्यांत उमेदवारी अर्ज अवैध ठरले. 

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया रात्री उशिरा पूर्ण झाली. त्यात, ४०४ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. येत्या सोमवार (ता. ४)पासून उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

१६ हजार ६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात

निवडणुकीसाठी १७ हजार सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले असून, गुरुवारी (ता. ३१) रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअंती ४०४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे सद्यःस्थितीत १६ हजार ६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, छाननीत आदिवासी इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर व देवळा (१) हे तालुके वगळता इतर सगळ्याच तालुक्यांत उमेदवारी अर्ज अवैध ठरले. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक! केवळ लेकरासाठीच मातेचे कष्ट अन् धडपड; नियतीचा घाला आला आणि सहा वर्षाचं लेकरू झालं पोरकं

तालुका ग्रामपंचायती एकूण अर्ज अवैध उमेदवार 

इगतपुरी ०८ १४७ ०० १४७ 

त्र्यंबकेश्‍वर ०३ ५० ०० ५० 

देवळा ११ ३३९ ०१ ३३८ 

दिंडोरी ६० १,३१८ १७ १,३०१ 

येवला ६९ १,७८६ १३ १,७७३ 

बागलाण ४० १,१३५ ३० १,१०५ 

कळवण २९ ६०७ ०६ ६०१ 
सिन्नर १०० २,७२५ ८६ २,६३९ 

निफाड ६५ २,४४९ ४२ २,४०७ 

चांदवड ५३ १,१४९ ३४ १,११५ 

नांदगाव ५९ १,७१७ ३२ १,६८५ 

मालेगाव ९९ २,८११ १११ २,७०० 

नाशिक २५ ७७२ २७ ७४३ 

एकूण ६२१ १७,००६ ४०४ १६,६०२ 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 404 candidature applications invalid in Nashik district nashik marathi news