आश्चर्यच!...लॉकडाउनमध्ये राज्यात 'इतक्या' सायबर गुन्ह्यांची नोंद?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून केले लॉकडाउन...पण गुन्हेगारी वृत्ती कशी लॉकडाऊन करणार?..काहींकडून जाणूनबुजून तर काहींकडून अजाणतेपणे का होयना, पण गुन्हा घडला. याच लॉकडाउनमध्ये राज्यात सायबर गुन्ह्यांतर्गत तब्बल इतके गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एवढ्या संशयितांना अटक केली आहे.

नाशिक : कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून केले लॉकडाउन...पण गुन्हेगारी वृत्ती कशी लॉकडाऊन करणार?..काहींकडून जाणूनबुजून तर काहींकडून अजाणतेपणे का होयना, पण गुन्हा घडला. याच लॉकडाउनमध्ये राज्यात सायबर गुन्ह्यांतर्गत तब्बल इतके गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एवढ्या संशयितांना अटक केली आहे. तर नाशिकमध्ये दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

आतापर्यंत 234 संशयितांना अटक

राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये सायबर कलमान्वये 433 पैकी 26 गुन्हे अदखलपात्र स्वरूपाचे आहेत. महाराष्ट्र सायबर शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये व्हॉट्‌सऍप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 181 गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्‌स शेअर केल्याप्रकरणी 170 गुन्हे दाखल आहेत. टिकटॉकच्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 22 गुन्हे दाखल आहेत. ट्‌विटरद्वारे आक्षेपार्ह ट्‌विट केल्याप्रकरणी आठ गुन्हे, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी चार गुन्हे, तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी 48 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांतील आतापर्यंत 234 संशयितांना अटक केली आहे. 

हेही वाचा > कधी संपणार 'या' वाड्यांची शोकांतिका?...अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव

शहरात 11 गुन्हे दाखल

नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सायबर कलमान्वये गुन्हा दाखल आहेत. संशयिताने फेसबुक प्रोफाइलच्या माध्यमातून दोन धर्मांत तेढ निर्माण होईल, अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट टाकली होती. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकला असता. 
दरम्यान, नाशिक शहरात 11 गुन्हे दाखल असून, यात आक्षेपार्ह पोस्ट, विनयभंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.  

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 433 cyber crimes in the state in lockdown nashik marathi news