नाशिक जिल्ह्यात ४७७ रूग्‍णांची कोरोनावर मात; चार रूग्‍णांचा मृत्‍यू

अरुण मलाणी
Friday, 23 October 2020

शुक्रवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २७१, नाशिक ग्रामीणचे १३८, मालेगाव व जिल्‍हाबाह्य प्रत्‍येक पाच रूग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या तुलनेत कोरोनामुक्‍त रूग्‍णांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत घट होते आहे. शुक्रवारी (ता.२३) दिवसभरात ४१९ नवीन बाधित आढळून आले. तर ४७७ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, चार रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ६२ ने घट झाली असून, सद्य स्‍थितीत ६ हजार ३६९ रूग्‍ण उपचार घेत आहेत. 

शुक्रवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २७१, नाशिक ग्रामीणचे १३८, मालेगाव व जिल्‍हाबाह्य प्रत्‍येक पाच रूग्‍णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील २८१, नाशिक ग्रामीणचे १८३, मालेगावचे नऊ तर जिल्‍हाबाह्य चार रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. चार मृत्‍यूंपैकी तीन नाशिक शहरातील असून, एका जिल्‍हाबाह्य रूग्‍णाचा मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ९१ हजार ४२१ झाला असून, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांची संख्या ८३ हजार ४२० वर पोहोचली आहे. १ हजार ६३२ रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८१५, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १०२, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १४, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात चार तर जिल्‍हा रूग्‍णालयात पाच रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत ७५१ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक ४५३ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील रूग्‍णांचे आहेत. 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 477 patients overcome corona in Nashik district marathi news