जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ५० हजार पार; तर डबलिंग रेट झाला 'इतक्या' दिवसांचा

अरुण मलाणी
Friday, 11 September 2020

शुक्रवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १ हजार ०८१, नाशिक ग्रामीणचे ४३७, मालेगावचे ३१, जिल्‍हाबाह्य दोन बाधितांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या १ हजार १३० रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ८१७, नाशिक ग्रामीणचे २६० रूग्‍णांचा समावेश असून, मालेगावच्‍या ५३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यात शुक्रवारी (ता.११) नव्‍याने १ हजार ५५१ कोरोना बाधित आढळून आले असून, एका दिवसात आढळलेल्‍या रूग्‍णाची ही सर्वाधिक संख्या आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांच्‍या संख्येने पन्नास हजारचा आकडा ओलांडला आहे. जिल्‍ह्‍यात आतापर्यंत ५० हजार ७६० बाधित आढळून आले आहेत. यापैकी ३९ हजार ७९८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ३५ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, सद्यस्‍थितीत ९ हजार ९२७ रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत.

डबलिंग रेट

गेल्‍या १७ ऑगस्‍टला पंचवीस हजार रूग्‍ण संख्या होती. यातून जिल्‍ह्‍यातील कोरोना रूग्‍णांचा डबलिंग रेट पंचवीस दिवसांचा झाला आहे. 
सुरवातीच्‍या काही दिवसांत रूग्‍ण संख्या दुप्पट होण्याचा दर अर्थात डबलिंग रेट सोळा ते अठरा दिवसांचा होता. गेल्‍या १७ ऑगस्‍टला जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांची संख्या २५ हजार २८८ झाली होती. पंचवीस दिवसांनी शुक्रवारी (ता.११) ही रूग्‍ण संख्या ५० हजार ७६० वर पोहोचली आहे.

नव्याने आढळलेली रुग्णसंख्या

शुक्रवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १ हजार ०८१, नाशिक ग्रामीणचे ४३७, मालेगावचे ३१, जिल्‍हाबाह्य दोन बाधितांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या १ हजार १३० रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ८१७, नाशिक ग्रामीणचे २६० रूग्‍णांचा समावेश असून, मालेगावच्‍या ५३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. पंधरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणचे पाच तर मालेगावच्‍या दोघा बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

दाखल झालेले रुग्ण

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ४७१, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २७९, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २०, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २९, जिल्‍हा रूग्‍णालयात तीन संशयित दाखल झाले आहेत. 

महिनानिहाय आढळलेले कोरोना बाधित असे 
महिना कोरोना बाधित 
एप्रिल २८१ 
मे ९४३ 
जून ३०४६ 
जुलै १०१८९ 
ऑगस्‍ट २२९२७ 
११ सप्‍टेंबरपर्यंत ५० 

रूग्‍णसंख्या वाढीचे टप्पे 
दिनांक रूग्‍णसंख्या 
२६ मे-------------१ हजार 
१५ जून------------२ हजार ०६८ 
४ जुलै-------------५ हजार ११२ 
२१ जुलै-----------१० हजार ०२५ 
१ ऑगस्‍ट----------१५ हजार ०५७ 
१० ऑगस्‍ट--------२० हजार ५११ 
१७ ऑगस्‍ट--------२५ हजार २८८ 
२३ ऑगस्‍ट-------३० हजार ००९ 
२९ ऑगस्‍ट--------३५ हजार ३२० 
३ सप्‍टेंबर---------४० हजार ४५३ 
८ सप्‍टेंबर---------४६ हजार ३२५ 
११ सप्‍टेंबर--------५० हजार 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

संपादन- रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 thousand corona patients crossed in Nashik district marathi news