धक्कादायक! मालेगावचा कोरोना इफेक्ट...औरंगाबादच्या ७२ सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 8 May 2020

मालेगावात कोरोनाचा थैमान वाढत असातानाच २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला. गरजेनुसार मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशा ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार, ३० मार्च रोजी औरंगाबाद एसआरपीएफच्या जवानांची डी कंपनी मालेगाव येथे रवाना झाली होती.

नाशिक / मालेगाव : मालेगावात दीड महिना बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील 72 जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते. कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्यानंतर २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला. गरजेनुसार मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशा ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आलेले जवान

मालेगावात कोरोनाचा थैमान वाढत असातानाच २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला. गरजेनुसार मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशा ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार, ३० मार्च रोजी औरंगाबाद एसआरपीएफच्या जवानांची डी कंपनी मालेगाव येथे रवाना झाली. दीड महिन्यांचा बंदोबस्त पूर्ण करून ५ मे रोजी ही कंपनी औरंगाबादेत परतली. त्यांना श्रेयस कॉलेजमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले. ६ मे रोजी आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅब घेतले होते. शुक्रवारी त्यांचे अहवाल आले.

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 72 CRPF army from Aurangabad who came to Malegaon for security were infected with corona virus nashik marathi news