Coronaupdate : जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ८४९ ने घट; तर दिवसभरात १५ मृत्‍यू

अरुण मलाणी
Wednesday, 23 September 2020

 जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मंगळवारी (ता. २२) कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात एक हजार १५४ नवीन बाधित आढळून आले, तर एक हजार ९८८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात पंधरा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.

नाशिक : जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मंगळवारी (ता. २२) कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात एक हजार १५४ नवीन बाधित आढळून आले, तर एक हजार ९८८ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात पंधरा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून दिवसभरात ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्‍या संख्येत तब्‍बल ८४९ ने घट झाली आहे. 

आठ हजार ४२३ बाधितांवर उपचार सुरू

बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील एक हजार ३१२, नाशिक ग्रामीणचे ६०२, मालेगावचे ६९, तर जिल्‍हाबाह्य पाच रुग्‍णांचा समावेश आहे. नव्‍याने आढळलेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ९०६, ग्रामीणचे २२१, मालेगावचे २१, तर सहा रुग्ण जिल्‍हाबाह्य आहेत. तसेच, पंधरा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील बारा, ग्रामीण भागातील एक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील दोन रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६६ हजार २१७ झाली आहे. यापैकी ५६ हजार ५८९ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एक हजार २०५ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे.

आठ हजार ४२३ बाधितांवर उपचार सुरू

सद्यःस्‍थितीत आठ हजार ४२३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.  दरम्‍यान, मंगळवारी नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ९२८, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १३५, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वीस, तर जिल्‍हा रुग्‍णालयात नऊ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ३९ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणचे एक हजार ३६१, नाशिक शहरातील ४७८, तर मालेगाव येथील दोनशे अहवाल आहेत. 

हेही वाचा > अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

मालेगावमध्ये बळींची संख्या दीडशेवर 

मालेगाव : शहरातील कोरोनाबळींची संख्या आज दीडशेवर पोचली. गेल्या २४ तासांत महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या एका रुग्णासह दोन संशयित व एक निगेटिव्ह अशा चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या शहरात १५०, तर तालुक्यात ४४ झाली आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये नामपूर येथील ३२ वर्षीय संशयित तरुणाचा समावेश असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी २५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ग्रामीण भागातील चार व शहरातील २१ जणांचा समावेश आहे. सध्या शहरात गृहविलगीकरणासह उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६१० आहे. नव्याने ३२ रुग्ण दाखल झाले. तर दोनशे अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७९.५१ टक्के झाली आहे. 

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 849 active corona patients decreased in nashik marathi news