आठ दिवसांत शहरात ९६ फिव्हर क्लिनिक सुरु करणार; महापालिकेचा निर्णय

विक्रांत मते
रविवार, 2 ऑगस्ट 2020

९६ फिव्हर क्लिनिक तयार करण्याचे उद्दीष्ट आहे. जसे डॉक्टर उपलब्ध होतील तशी संख्या वाढविली जाणार आहे. पावसामुळे डेंगी, मलेरिया, ताप, सर्दी, खोकला असे ३६०० प्रकारचे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. त्यामुळे फक्त कोरोना या विषयापुरते मर्यादीत न राहता या आजारांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना डेंगी, मलेरिया, सर्दी, खोकला यासारख्या आजारांनी तोंड वर काढण्यास सुरुवात केल्याने संकटात अधिक भर नको म्हणून महापालिकेच्या वतीने शहरात ९६ फिव्हर क्लिनिक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये ७५ क्लिनिक येत्या आठ दिवसात सुरु केले जाणार आहे. 

प्रशासनाचा फिव्हर क्लिनिकचा पर्याय

कोरोनाचा आकडा दहा हजारी पार जात असताना महापालिका अधिक सतर्क झाली आहे. राजकीय पक्षांनी देखील तपासण्यांचा धडाका लावून पालिकेला सहकार्य होत असल्याने कोरोनाची साखळी खंडीत होण्याच्या मार्गावर आहे. फुले नगर, वडाळा या सारखे कोरोना हॉटस्पॉट नियंत्रणात येत असताना सातपूर, सिडको या कामगार वसाहती मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांच्या दुसया संकटाचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने फिव्हर क्लिनिकचा पर्याय निवडला आहे. महापालिकेच्या वतीने वैद्यकिय विभागातील रिक्त पदांसह अतिरिक्त पदे मानधनावर भरली जात आहे. दोन दिवसात प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर नियुक्त केलेल्या डॉक्टर, नर्सेस व कर्मचायांची नियुक्ती फिव्हर क्लिनिक मध्ये केली जाणार आहे.

अशी होईल तपासणी 

महापालिकेचे शहरी आरोग्य केंद्रे, अंगणवाडी, समाजमंदीरे आदीं मिळकतींचा वापर होईल. कोरोना व साथीच्या आजारांची लक्षणे सारखीच असली तरी यापुढे अशी लक्षणे असलेले सर्वचं रुग्ण कोरोना म्हणून तपासले जाणार नाही. कोरोना संसर्गात महत्वाचा भाग म्हणजे रुग्णाची प्राणवायु (ऑक्सिजन) घेण्याची क्षमता कमी होते. ही बाब हेरून सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असलेली रुग्णांवर फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून पालिकेच्या वतीने मोफत उपचार केले जातील. एखाद्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावलेली असेल तर त्यावर कोरोनाचा रुग्ण म्हणुन उपचार केले जातील अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली. 

कंटेनमंट झोेन मध्ये विशेष तपासणी 

९६ फिव्हर क्लिनिक तयार करण्याचे उद्दीष्ट आहे. जसे डॉक्टर उपलब्ध होतील तशी संख्या वाढविली जाणार आहे. पावसामुळे डेंगी, मलेरिया, ताप, सर्दी, खोकला असे ३६०० प्रकारचे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव अधिक वाढतो. त्यामुळे फक्त कोरोना या विषयापुरते मर्यादीत न राहता या आजारांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. महापालिकेने आतापर्यंत जाहीर केलेले व सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या कंटेनमेंट झोन मध्ये फिव्हर क्लिनिक उभारले जाणार आहे. दाट लोकसंख्या, झोपडपट्टी भागाकडे विशेष करून फिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून लक्ष दिले जाणार आहे. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतं असल्याने कोरोना संसर्गाकडेचं लक्ष केंद्रीत न करता अन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फिव्हर क्लिनिक द्वारे विशेष तपासणी केली जाणार आहे. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका. 

ऑक्सिजन लेव्हल कमी असेल तर कोरोना म्हणून उपचार केले जातील. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असलेल्यांना त्या भागातील समाजमंदीरे, अंगणवाडी किंवा शहरी आरोग्य केंद्रात फिव्हर क्लिनिक च्या माध्यमातून उपचार दिले जातील. - डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 96 fever clinics in the city; Municipal remedy for epidemic diseases nashik marathi news