
रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधारकार्डचे सत्यापन करून घेणे सक्तीचे करण्यात आले असल्याने अन्नधान्य मिळण्यास पात्र अशा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी ही काळजी घ्यायची आहे.
येवला (जि. नाशिक) : ई-पॉस मशिनवर असलेल्या कुटुंबातील सदस्यांपैकी ज्या व्यतीचे आधार क्रमांक लिंक नाही त्यांनी तत्काळ आपले गावातील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन ई-पॉस मशिनवर ३१ जानेवारी २०२१ पर्यंत आधार लिंक करण्यात यावे अन्यथा शिधापत्रिकेतून नावे वगळल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिधापत्रिकाधारकाची असेल, असे आवाहन तहसीलदार प्रमोद हिले यांनी केले आहे.
ई-पॉस मशिनवर सुविधा उपलब्ध
रेशन कार्डमधील सदस्यांच्या आधारकार्डचे सत्यापन करून घेणे सक्तीचे करण्यात आले असल्याने अन्नधान्य मिळण्यास पात्र अशा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी ही काळजी घ्यायची आहे. रेशन दुकानांतील गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका आणि रास्त भाव दुकाने बायोमेट्रिक प्रणाली, तसेच आधारकार्डशी जोडण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांचे आधार सिडिंग तसेच ई-केवायसी पडताळणी मोहीम राज्यात राबविण्यात येत असून, तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांनी आपल्या शिधापत्रिकेपैकी ऑनलाइन असलेल्या नावासमोर आधार लिंक केलेले नाही, अशा सर्व शिधापत्रिकांमध्ये आधार व मोबाईल क्रमांक लिंक करण्याची कार्यवाही संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांकडे ई-पॉस मशिनवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या