#Lockdown : कोलकात्याला अडकले नाशिकचे सुमारे २५० मुस्लीम बांधव

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 25 मार्च 2020

देशभरात दळवळणाची साधने बंद झाली आहेत. मात्र त्यापूर्वी नाशिकमधील अडीचशे मुस्लीम समाज बांधव येथे मालदा टाऊन पासून १८ किलो मीटर अंतरावरील एका गावात अडकले आहेत. दरवर्षी येथील पंडवाश्री दर्ग्यास भेट देण्यासाठी हे नागरीक जात असतात. यंदा १३ मार्चला ते गेल्यानंतर २३ मार्च रोजी मालदा टाऊन ते नाशिकरोड अशी त्यांची रेल्वे होती. मात्र

नाशिक : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. पण देशभरात लॉकडाऊन होण्याआधीच दळणवळणाची साधने बंद झाल्याने नाशिक शहरातील अडीचशे मुस्लीम समाज बांधव कोलकत्याजवळ मालदा टाऊन येथे अडकले आहेत. त्यांना नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक अडचणी असून मदतीसाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला आवाहन केले आहे. 

दळवळणाची साधने बंद झाल्याने अडकले नागरिक
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. आजपासून 21 दिवस देशात लॉकडाऊन असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे प्रशासनानंही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशभरात दळवळणाची साधने बंद झाली आहेत. मात्र त्यापूर्वी नाशिकमधील अडीचशे मुस्लीम समाज बांधव येथे मालदा टाऊन पासून १८ किलो मीटर अंतरावरील एका गावात अडकले आहेत. दरवर्षी येथील पंडवाश्री दर्ग्यास भेट देण्यासाठी हे नागरीक जात असतात. यंदा १३ मार्चला ते गेल्यानंतर २३ मार्च रोजी मालदा टाऊन ते नाशिकरोड अशी त्यांची रेल्वे होती.

हेही वाचा > पोल्ट्री व्यवसायाला जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांचा दिलासा...लॉकडाऊनमध्येही मिळणार चिकन अन् अंडी!

मात्र त्यांना त्यापूर्वी २० तारखेला रेल्वेने तिकीट आरक्षण रद्द करून रेल्वही जाणार नसल्याचे कळवले. त्यातच विमास सेवा देखील बंद झाल्याने त्यांची अडचण झाली आहे.नाशिक शहरातील जुने नाशिक आणि नाशिकरोड भागातील नागरीक आहेत. त्यांनी मदतीसाठी याचना केली आहे.

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: About two hundread fifty Muslim people from Nashik trapped in Kolkata marathi news