थरारक! विवाहावरून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; दोन महिला जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

लग्नसोहळा आटोपून मालेगावी परतत होते वऱ्हाड..पण परतताना त्यांना जराही कल्पना नसेल की, त्यांच्यावर असा दुर्देवाचा फेरा येईल...काय घडले वाचा

नाशिक / मालेगाव : लग्नसोहळा आटोपून मालेगावी परतत होते वऱ्हाड..पण परतताना त्यांना जराही कल्पना नसेल की, त्यांच्यावर असा दुर्देवाचा फेरा येईल...काय घडले वाचा

विवाहाला हजेरी लावून परतताना घडला प्रकार

मनमाड येथून विवाहाला हजेरी लावून मंगळवार (ता.२०) वऱ्हाड मालेगावी परतत असताना कार (एमएच 11 एके 5583) अल्लमा एकबाल पुलावर थांबली. त्यातून प्रवासी महिला खाली उतरत असतानाच भरधाव वेगात आलेल्या मालट्रकने (एमएच 04 सीए 3319) कारला धडक दिली. त्यात शकिला मो. शेख (45) व मलिका शेख नईम (60) या महिला जागीच ठार झाल्या.

दोघी फरफटत गेल्या

तर दोघी अमिनाबी व मायराबी या फरफटत गेल्या. तसेच इतर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. मालट्रक कारला धडकल्यानंतर काही अंतर तसाच धावला. पुलावर उभ्या स्विफ्ट कारलाही (एमएच 48 ए 1811) धडक दिली. स्थानिकांनी धाव घेत जखमींना उपचारार्थ दवाखान्यात पाठविले. मालट्रक चालक मो. अमीन शफीक अहमद (रा. म्हाळदे शिवार) याला ताब्यात घेण्यात आले. त्याविरोधात किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लग्नसोहळा आटोपून मालेगावी परतणाऱ्या वऱ्हाडाच्या कारला भरधाव मालट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार, दहा जण जखमी झाले आहेत. यातील तीन महिला गंभीर जखमी आहेत. शहरातील अल्लमा एकबाल पुलावर सोमवारी रात्री हा अपघात झाला. चालकाला अटक करण्यात आली असून, किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident at manmad malegaon nashik marathi news