दुर्दैवी! रोजगाराच्या आशेने मुंबईची ओढ; वाटेतच परप्रांतीय श्रमिकांवर काळाचा घाला

गोपाळ शिंदे
Saturday, 12 September 2020

लॉकडाउनदरम्यान गावाकडे गेलेले परप्रांतीय मजूर पुन्हा मुंबईकडे रोजगाराच्या दिशेने निघाले आहेत. यातच उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील परप्रांतीय श्रमिकांना ठाणे-भाईंदर येथे कामासाठी येत होते. पण स्वप्न पूर्ण होण्याऐवजीच वाटेतच काळाचा घाला आला. वाचा सविस्तर...

नाशिक / घोटी : लॉकडाउनदरम्यान गावाकडे गेलेले परप्रांतीय मजूर पुन्हा मुंबईकडे रोजगाराच्या दिशेने निघाले आहेत. यातच उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील परप्रांतीय श्रमिकांना ठाणे-भाईंदर येथे कामासाठी येत होते. पण स्वप्न पूर्ण होण्याऐवजीच वाटेतच काळाचा घाला आला. वाचा सविस्तर...

रोजगाराचे स्वप्न अपूर्णच

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील परप्रांतीय श्रमिकांना ठाणे-भाईंदर येथे कामासाठी घेऊन जाणाऱ्या प्रवासी रिक्षाला (एमएच ०४ जेक्यू ६५०६) मुंबई-नाशिक मार्गावरील मुंढेगाव शिवारात मागून येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने रिक्षाचालक अजय पटेल (वय ४५) जागीच ठार झाला. रिक्षातील बिसाल गुप्ता (२६), रोहित गुप्ता (२७), जालिंदर यादव (३२, सर्व रा. देवरिया, उत्तर प्रदेश) गंभीर जखमी झाले. जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

रिक्षाचालक जागीच ठार

मुंबई-नाशिक महामार्गावर मुंढेगाव शिवारात परप्रांतीय श्रमिकांच्या रिक्षाचा शुक्रवारी (ता. ११) पहाटे साडेपाचला अपघात झाला. यात रिक्षाचालक जागीच ठार तर, तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident to migrant workers rickshaw nashik marathi news