रेणुका मातेची ज्योत आणणाऱ्या देवीभक्तावर नियतीचा घाला; मुंबई-आग्रा महामार्गावरील दुर्दैवी घटना

प्रमोद सावंत
Monday, 19 October 2020

मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना...रेणुकामातेची ज्योत आणयला म्हणून संतोष गेला. मात्र नियतीची खेळी कोणाला कळते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्तासोबत नशिबाने खेळ मांडला, या घटनेने संपूर्ण गावाला हादरा बसला आहे. 

नाशिक : (मालेगाव) मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना...रेणुकामातेची ज्योत आणयला म्हणून संतोष गेला. मात्र नियतीची खेळी कोणाला कळते. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्तासोबत नशिबाने खेळ मांडला, या घटनेने संपूर्ण गावाला हादरा बसला आहे. 

रेणुका मातेची ज्योत आणणाऱ्या देवीभक्तावर नियतीचा घाला

संतोष चैत्राम जाधव (वय २८, रा. गिगाव) हा तरुण देवीभक्त शनिवारी (ता. १७) सायंकाळी रेणुकामाता, चांदवड येथून देवीची ज्योत आणायला निघाला. त्यावेळी नियतीचा घाला आला आणि मनमाड चौफुलीजवळ अनोळखी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह फरारी झाला. गंभीर जखमी संतोषला अत्यवस्थ स्थितीत येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. किल्ला पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तरुणाच्या अपघाती निधनाबद्दल माळमाथा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

परिसरात हळहळ; परिवारावर शोककळा​

रेणुकादेवीची ज्योत आणतांना संतोषचा अपघाती मृत्यू झाल्याने परिवारावर शोककळा पसरली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषला अनोळखी वाहनाने धडक देऊन पळ काढला. या वाहनचालकाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of devotee nashik marathi news