दिवाळीच्या तोंडावरच जीवलग मित्रांच्या निघाल्या अंत्ययात्रा; अखेरच्या क्षणीही साथ कायम; अख्खे गाव हळहळले

विक्रांत मते
Friday, 13 November 2020

रोहितचा जानेवारी महिन्यात विवाह निश्‍चित झाला होता. लहानपणापासून मैत्री असलेले रोहित व अतुल दोघेही तरुण मुलं. त्यांच्या अचानक आलेल्या बातमीने अख्खे गाव हळहळले आहे.

नाशिक : रोहितचा जानेवारी महिन्यात विवाह निश्‍चित झाला होता. लहानपणापासून मैत्री असलेले रोहित व अतुल दोघेही तरुण मुलं. त्यांच्या अचानक आलेल्या बातमीने अख्खे गाव हळहळले आहे. जीवनाच्या अखेरच्या क्षणी सुध्दा त्यांचा हात घट्ट कायम होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर दोघांच्याही अंत्ययात्रा निघाल्या. काय घडले नेमके वाचा..

लहानपणापासून मैत्री शेवटच्या क्षणीही कायम

लहानपणापासून मैत्री असलेले रोहित व अतुल दोघेही टाकळी रोडवरील इंद्रायणी सोसायटी व परिसरात वास्तव्याला होते.कंपनीची ड्यूटी संपल्यानंतर दोघेही तिसऱ्या मित्राला घरी सोडण्यासाठी गेले होते. दुचाकीवरून मध्यरात्री दीडच्या सुमारास दोघे घरी परतत असताना अज्ञात वाहनाने उजव्या बाजूने धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रोहित मागे बसला होता. धडकेनंतर वाहनाच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

दोघांच्या ही अंत्ययात्रा ऐन दिवाळीच्या तोंडावर

औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिर्ची येथील गोदावरी लॉन्ससमोर अपघातात दोघ जिवलग मित्रांचे निधन झाले. ९ नोव्हेंबरला वाहनाच्या धडकेने रोहित संजय पिंगळे (वय २७) याचे जागीच निधन झाले, तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या अतुल अशोक शिंदे (वय २६) याचे रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी निधन झाले. दोघेही तरुण मुले गेल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. कारण दोघांच्या ही अंत्ययात्रा ऐन दिवाळीच्या तोंडावर निघाल्या आहेत.

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death of two friends nashik marathi news