तिचे अपहरण...त्यानंतर बलात्कार..आठ वर्षे गायब..

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 6 January 2020

पीडितेचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग केला होता. त्याच्याविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित फरारी होता.

नाशिक : भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत 2012 मध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची घटना घडली. विलास दामू बाविस्कर (वय 29, रा. मोरंबी, इगतपुरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याने पीडितेचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग केला होता. त्याच्याविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित फरारी होता. अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या संशयितास पकडण्यात तब्बल आठ वर्षांनंतर भद्रकाली पोलिसांना यश आले.

तब्बल आठ वर्षांनंतर भद्रकाली पोलिसांना यश​

न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले. त्यानुसार त्याचा शोध सुरू होता. वॉरंट ड्यूटी करणारे पोलिस कर्मचारी विजय मोरे आणि बाराईत यांना संशयित इगतपुरी येथील घरी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी रविवारी (ता. 5) इगतपुरी गाठत अटक करून भद्रकाली पोलिस ठाण्यात आणले. सोमवारी (ता. 6) त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मारहाणीच्या प्रकरणात 12 वर्षांपासून पाहिजे असलेल्या संशयितासही शनिवारी (ता. 4) ताब्यात घेतले. सुनील दर्यासिंग कल्याणी (वय 39, रा. कथडा मनपा वसाहत) असे नाव आहे. 2008 मध्ये मनपा वसाहतीत गंभीर स्वरूपाच्या मारहाणीची घटना घडली होती. भद्रकाली पोलिसांत गुन्हा करण्यात आला होता. त्यावेळी तो फरारी झाल्याने पोलिसांच्या हाती लागला नाही. न्यायालयाने त्याच्याविरुद्धही अटक वॉरंट जारी केले होते. त्यालाही भद्रकाली पोलिस ठाण्याच्या पथकाने मनपा वसाहत परिसरातून अटक केली.  

हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..​

हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused of rape arrested by Bhadrakali police team Nashik Crime Marathi news