नाशिकमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई; १ लाख २७ हजारांचा दंड वसूल

विक्रांत मते
Tuesday, 22 September 2020

सार्वजनिक ठिकाणी शौच करणे व थुंकण्यास पूर्वीपासूनच बंदी आहे. हा नियम आतापर्यंत कोणी पाळत नव्हते, महापालिकेकडेदेखील कर्मचारी नसल्याने याकडे लक्ष दिले जात नव्हते. आता कोरोनामुळे हा नियम पाळणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे.

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी शौच करणे व थुंकण्यास पूर्वीपासूनच बंदी आहे. हा नियम आतापर्यंत कोणी पाळत नव्हते, महापालिकेकडेदेखील कर्मचारी नसल्याने याकडे लक्ष दिले जात नव्हते. आता कोरोनामुळे हा नियम पाळणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. विनामास्क फिरणार्‌या ६३६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ६१ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने दंड आकारण्यात आला. 

स्वतःबरोबरच इतरांची काळजी घेण्याचे आवाहन

एप्रिलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर महिन्याला कोरोनाबाधितांचे आकडे मागच्या महिन्याचा विक्रम मोडीत निघाले. ऑगस्टमध्ये पाचशेच्या आसपास कोरोनाबाधित आढळले. सप्टेंबरमध्ये एक हजारांच्या पटीत कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने आतापर्यंत सेफ झोनमध्ये असलेले नाशिक कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे डेंजर झोनमध्ये आले. त्यामुळे नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी जोपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने स्वतःबरोबरच इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याच अनुषंगाने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यापूर्वीपासूनच महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली. असली तरी आयुक्तांच्या आवाहनानंतर कर्मचारी वाढवत कारवाईला अधिक गती देण्यात आली आहे. 

हेही वाचा > अक्राळविक्राळ रात्री भेदरलेल्या अवस्थेत मुलाबाळांसह घर सोडले...; विटावेच्या अनिल पवारांंची थरारक आपबिती

...तरीही निष्काळजीपणा कायम 

सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणायांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रतिव्यक्ती दोनशे रुपयांप्रमाणे जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ६३६ लोकांकडून एक लाख २७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणायांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणायांवर कारवाई करण्यात आली. जून ते अठरा सप्टेंबर या कालावधीत थुंकणारऱ्या ६१ लोकांकडून ५८ हजार ५५० रुपये दंड वसूल केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. दंड आकारण्यामागे महसूल मिळविणे हा महापालिकेचा हेतू नव्हे, तर शिस्त लागली पाहिजे. दंडात्मक कारवाई करूनही निष्काळजीपणा कायम दिसत आहे. 

हेही वाचा > आश्चर्यच! आठवड्यात गायीने दिला दोनदा जन्म; डॉक्टरांच्या गोठ्यातील किमया  

संपादन - रोहित कणसे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action against people without mask nashik marathi news