बंदी असूनही हॉटेलमध्ये हे काय सुरू होते? तपासणी करताच पोलीसांना धक्काच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र सरकारने व राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली असताना शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत तालुक्‍यातील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला.

नाशिक / इगतपुरी : संपूर्ण देशात व राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र सरकारने व राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली असताना शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत तालुक्‍यातील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला.

काय घडले नेमके?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व राज्य शासनाने हॉटेल उघडण्यावर बंदी घातली असताना शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवत तालुक्‍यातील हॉटेल सुरू असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. रेन फॉरेस्ट हॉटेल सुरू असल्याची माहिती मिळताच इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी जात कारवाई केली. या हॉटेलमध्ये 28 व 29 जूनला लग्नाचे बुकिंग होते. यानिमित्ताने 50 ते 60 वऱ्हाडी दाखल झाले होते. या लग्नासाठी आपण शासनाची रीतसर परवानगी घेतली असल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापकाने दिली. या वेळी हॉटेलात आलेल्या वाहनांची पोलिसांनी तपासणी करून दंडात्मक कारवाई केली. तसेच हॉटेलवर कलम 188 नुसार कारवाई केली. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

वऱ्हाडी व त्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई

कोरोना काळात हॉटेल व तत्सम व्यवसाय बंद असताना तालुक्‍यातील विविध रिसार्ट, हॉटेल बिनधास्त सुरू असल्याचे चित्र आहे. ही बाब स्पष्ट झाली ती तालुक्‍यातील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट हॉटेलवर इगतपुरी पोलिसांनी शनिवारी (ता. 27) टाकलेल्या कारवाईनंतर. या ठिकाणी थांबलेले सुमारे 60 वऱ्हाडी व त्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना सोडण्यात आले. 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action against Rain Forest Hotel nashik marathi news