आंतरराज्य रॅकेटचा भांडाफोड! परराज्यातील अवैध मद्यविक्रीवर एकत्रित हातोडा; लाखो रुपयांचा गैरव्यवहाराचा पदार्फाश

liquor1.jpeg
liquor1.jpeg

नाशिक : दमण येथील वर्षानुवर्षांची अवैध दारू महाराष्ट्रातील दारू दुकानातून विक्रीच्या अवैध धंद्यावर पोलिसांनी जोरदार हातोडा घातला. दमण येथून येणारी परराज्यातील दारू पकडल्यानंतर सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांनी दारूविक्रीच्या संशयावरून तब्बल १४ दारू दुकान सील केली. त्यामुळे परराज्यातील दारू इकडच्या बाटल्यांत भरून विकण्याचा लाखो रुपयांचा वर्षानुवर्षांच्या गैरव्यवहाराचा पदार्फाश होण्याची आशा वाढली आहे. 

लाखो रुपयांचा वर्षानुवर्षांच्या गैरव्यवहाराचा पदार्फाश

पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह महसूल-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकत्रित कारवाईच्या या दणक्यामुळे वर्षानुवर्षांच्या गैरव्यवहाराला कायमचा चाप बसण्याची आशा निर्माण झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईनंतर परराज्यातील अवैध दारूविक्री वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दादरा- नगर हवेली आणि दिव दमण या केंद्रशासित प्रदेशातील दारूच्या महापुराच्या या एकत्रित कारवाईमुळे भांडाफोड होण्याची शक्यता वाढली आहे. या घडक कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला असून, परराज्यातील अवैध दारूविक्रीच्या संशयावरून शहरातील नामांकित दारू विक्रेत्यांची शहरातील चौदा दुकाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सील करण्यात आली आहेत. 


आंतरराज्य रॅकेटचा भांडाफोड 
पोलिस आयुक्त पांडे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्याशी पोलिसांचा संबंध जोडता येणार नाही. विविध सरकारी कार्यालयांवर अवैध धंदे निर्मूलनाची जबाबदारी असून, एकटे पोलिस दल बदनाम कशासाठी, असा प्रश्‍न करीत विविध विभागांना पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार बैठकीत जिल्ह्यात अवैध धंद्याच्या समूळ उच्चाटनासाठी एकत्रित समिती नेमून ठोस कारवाईचा एकमुखी निर्णय घेतला. या सगळ्या घडामोडींचे फलीत म्हणून केंद्रशासित प्रदेशातील दारूचा भांडाफोड करण्यात यश आल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार शांतपणे अवैध दारूविरोधात एकत्रित कारवायाचा धडाका सुरू झाला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात पाळंमुळे 
दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातून अल्पदरात दारूचा उत्तर महाराष्ट्रात महापूर सुरू आहे. टेहरे फाटा (मालेगाव) येथे पशुखाद्याच्या गोण्याआड ट्रकमधून मद्यवाहतुकीच्या प्रकरणाच्या निमित्ताने हे पुढे आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी गंभीर दखल घेत नाशिक गाठून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार दारू दुकानांच्या झाडाझडतीत वाहतूक परवाना नसलेला देशी दारूचा साठा मिळाला. तसेच उर्वरित दुकानांत विसंगती आढळल्याने शहरातील १४ दारू दुकाने सील करण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com