विनापरवानगी शहरात आलात..तर याद राखा..!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

विनापरवानगी शहरात आलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर वॉर्डनिहाय समिती गठीत करावी व प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आदेश पालिका प्रशासनला दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक वॉर्डात समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

नाशिक / येवला : येवला येथे कोरोनाबाधितांची संख्या 32 वरून शून्य झाली होती. पुन्हा रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. गुरुवारी (ता. 28) काढलेल्या आदेशात पालिका कार्यक्षेत्रात मुंबई, पुणे, ठाणे, पिंप्री-चिंचवड, मालेगाव व कोरोनाबाधित परिसरातून कोणीही विनापरवानगी येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

....फौजदारी गुन्हे दाखल होतील मग

विनापरवानगी शहरात आलेल्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर वॉर्डनिहाय समिती गठीत करावी व प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आदेश येवला उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांनी पालिका प्रशासनला दिले. त्यानुसार प्रत्येक वॉर्डात समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली. 

तातडीने आरोग्य विभागाला अवगत करावे

तरीही कुणी आल्यास त्याला वास्तव्य करू देऊ नये व अशा व्यक्तीवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मात्र परवानगी घेऊन आल्यास त्यांना 14 दिवस होम क्वारंटाइन करावे तसे शक्‍य नसल्यास संस्थागत अलगीकरण करण्यात येऊन सर्व सुविधा पुरवाव्यात या व्यक्तींनी क्वारंटाइनचा भंग केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. तसेच यातील कुणाला कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला अवगत करावे.

स्वखर्चाने पालिकेकडून वाहन निर्जंतुक

पालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवसाय व दुकानांची नियमित तपासणी करण्यात यावी, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या चालकाने रोज आरोग्य तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. या चालकाला प्रवासानंतर घरातच थाबांवे लागणार आहे. त्याने रोज आरोग्य तपासणी करून घेणेही बंधनकारक आहे. सोबतच स्वखर्चाने पालिकेकडून वाहन निर्जंतुक करून घ्यावे, असे आदेशही देण्यात आले आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

साथीच्या आजारासाठी करावेत उपचार 
पालिका किंवा ग्रामपंचायत क्षेत्रातील व्यक्ती साथीच्या आजाराने ग्रस्त असतील, तर त्यांचाही शोध घेऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आदेश देऊन या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी वॉर्डनिहाय समिती गठीत करावी व या समितीला सक्त सूचना द्याव्यात. आपल्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे कावरे यांनी या आदेशात म्हटले आहे. 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: action will take against those who come without permission nashik marathi news