Corona Update : ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णसंख्येत जिल्ह्यात २१९ ने घट; नवीन बाधितांची संख्या हजारपेक्षा कमी

अरुण मलाणी
Friday, 9 October 2020

शुक्रवारी दिवसभरात नाशिक शहरामध्ये ४०५, नाशिक ग्रामीणला ३६१, मालेगावला सोळा तर, जिल्‍हाबाह्य चार कोरोना बाधित आढळले. तर, नाशिक शहरातील ४५६, नाशिक ग्रामीणचे ४९५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, मालेगावचे पन्नास रूग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

नाशिक : जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या सातत्‍याने एक हजारपेक्षा कमी आणि बरे होणाऱ्या रूग्‍णांची संख्या एक हजारपेक्षा अधिक राहिल्‍याने ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांच्या संख्येत घट होत आहे. शुक्रवारी (ता. ९) जिल्ह्यात नव्‍याने ७९६ बाधित आढळले असताना, १ हजार ००१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. तर चौदा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला. यातून जिल्ह्यातील ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णांमध्ये २१९ ने घट झाली आहे. 

शुक्रवारी दिवसभरात नाशिक शहरामध्ये ४०५, नाशिक ग्रामीणला ३६१, मालेगावला सोळा तर, जिल्‍हाबाह्य चार कोरोना बाधित आढळले. तर, नाशिक शहरातील ४५६, नाशिक ग्रामीणचे ४९५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, मालेगावचे पन्नास रूग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. चौदा मृतांमध्ये नाशिक शहरातील तीन, नाशिक ग्रामीणचे नऊ तर, जिल्‍हाबाह्य दोन रूग्ण आहेत. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८४ हजार ३७० झाली असून, यापैकी ७४ हजार ११२ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ४९८ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर सद्यस्‍थितीत ८ हजार ८६० बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात दाखल संशयितांमध्ये नाशिक महापालिका हद्द व गृहविलगीकरणात १ हजार ०३२, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७३, मालेगावला तेरा, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १० तर, जिल्‍हा रूग्‍णालयात आठ संशयित दाखल झाले. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ३२८ अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 

मालेगावला २५ रूग्ण 

मालेगाव : शहर व तालुक्यात शुक्रवारी नव्याने २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील १६ तर, ग्रामीण भागातील ९ जणांचा समावेश आहे. दरम्यान शहर व परिसरातील दोन कोरोनाबाधित व एक संशयित अशा तिघांचा गेल्या २३ तासात महापालिकेच्या सहारा काेविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यात अंबरनाथ (ठाणे) येथील ४६ वर्षीय कोरोनाबाधित महिला, नामपूर (ता. बागलाण) येथील ६३ वर्षीय कोरोनाबाधित पुरुष तसेच, शहरातील हाजीपार्क भागातील ७० वर्षीय संशयित पुरूषाचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबळींची संख्या १६० झाली आहे. येथील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५१ टक्के झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आज नव्याने १३ जण मनपा रुग्णालयात दाखल झाले. १३६ अहवाल प्रलंबित आहेत.  

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: active corona patient decreases to 219 in nashik marathi news