जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्णसंख्येत ७९ ने घट; तर दिवसभरात ३१७ रुग्‍ण कोरोनामुक्‍त

अरुण मलाणी
Sunday, 8 November 2020

दिवसभरात २४१ बाधित आढळले असताना, ३१७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तर तीन रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ७९ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दोन हजार ८५६ रुग्‍ण उपचार घेत आहेत. 

नाशिक : कोरोनाबाधितांची घटती संख्या दिलासादायक असून, यातून ॲक्टिव्‍ह रुग्णसंख्येत सातत्‍याने घट होत आहे. शनिवारी (ता. ७) दिवसभरात २४१ बाधित आढळले असताना, ३१७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तर तीन रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ७९ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दोन हजार ८५६ रुग्‍ण उपचार घेत आहेत. 

नव्याने आढळले २४१ बाधित

शनिवारी आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १६३, नाशिक ग्रामीणचे ७२, मालेगावचे पाच, तर जिल्‍हाबाह्य एका रुग्‍णाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील २९०, नाशिक ग्रामीणचे २२, मालेगावचे दोन, जिल्‍हाबाह्य तीन रुग्ण आहेत. दिवसभरात कोरोनामुळे दगावलेले तिन्‍ही रुग्‍ण नाशिक ग्रामीण भागातील आहेत. मनमाड, दुगाव व नगरसूल येथील हे वयोवृद्ध रुग्ण आहेत. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

३१७ रुग्‍ण कोरोनामुक्‍त 

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९५ हजार ३५१ झाली असून, ९० हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. एक हजार ६९९ रूरुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५७५, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २४, मालेगाव हद्दीत चार, तर डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन, जिल्‍हा रुग्‍णालयात तीन रुग्‍ण दाखल झाले आहेत.  

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: active corona patients Decreased by 79 in the district nashik marathi news