Coronaupdate : जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ४६५ ने वाढ; तर दिवसभरात ८५६ कोरोनामुक्‍त

corona2.jpg
corona2.jpg

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्‍या एकूण संख्येने ७५ हजारांचा आकडा ओलांडला आहे. बुधवारी (ता. ३०) दिवसभरात एक हजार २४३ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ७५६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तर, २२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्या संख्येत ४६५ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात आठ हजार ११५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात ८५६ कोरोनामुक्‍त, २२ रुग्‍णांचा मृत्‍यू 

बुधवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये शहरातील ७७२, नाशिक ग्रामीणचे ४४४, मालेगावचे १६, तर जिल्‍हाबाह्य अकरा कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ६१२, नाशिक ग्रामीणचे ११८, मालेगावचे १७, तर जिल्‍हाबाह्य नऊ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील २२ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील चार, नाशिक ग्रामीणचे १६, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन रुग्‍णांचा समावेश आहे. यातून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७५ हजार ८७६ झाली असून, यापैकी ६६ हजार ३९१ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. एक हजार ३७० रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ८९० संशयित दाखल झाले. 

जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयित दाखल

नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १४८, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २४, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयित दाखल झाले आहेत. प्रलंबित अहवालांचे प्रमाण पुन्‍हा एकदा वाढले असून, सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ४१६ अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार ८५८ अहवाल नाशिक ग्रामीणमधील रुग्‍णांचे आहेत. 

मालेगावमध्ये दोघांचा मृत्यू 

मालेगाव : शहरातील दोन कोरोनाबाधितांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबळींची संख्या १५४ झाली आहे. नव्याने १६ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, दिवसभरात नव्याने २४ रुग्ण दाखल झाले. शहरातील गृहविलगीकरणासह कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५१२ आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, ते ८३.१४ टक्के झाले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com