पहिल्या पिढीने कमावले..अन्‌ दुसऱ्याने उडविले...प्रसिध्द सराफ पेढीकडून ग्राहकांच्या विश्‍वासाची माती!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

त्यांच्या पहील्या पिढीवर ग्राहकांचा मोठा विश्‍वास असल्याने गुंतवणूकदारांनी डोळे झाकुन पैसा गुंतवला.मात्र दुसऱ्या पिढीने त्या पैशाची परतफेड करण्याऐवजी महागड्या गाड्या खरेदी करीत उधळपट्टी केली .त्यामुळे आज शहरातील सराफ व्यावसायीकात पहील्या पिढीने कमावले अन्‌ दुसऱ्या पिढीने गमावले अशीच चर्चा आहे वाचा नक्की काय आहे फसवणुकीचा प्रकार....... 

नाशिक : त्यांच्या पहील्या पिढीवर ग्राहकांचा मोठा विश्‍वास असल्याने गुंतवणूकदारांनी डोळे झाकुन पैसा गुंतवला.मात्र दुसऱ्या पिढीने त्या पैशाची परतफेड करण्याऐवजी महागड्या गाड्या खरेदी करीत उधळपट्टी केली .त्यामुळे आज शहरातील सराफ व्यावसायीकात पहील्या पिढीने कमावले अन्‌ दुसऱ्या पिढीने गमावले अशीच चर्चा आहे वाचा नक्की काय आहे फसवणुकीचा प्रकार....... 

पहिल्या पिढीने कमावले अन्‌ दुसऱ्याने गमावले..... 

सोन्याच्या विविध योजनांमधील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आडगावकर सराफांविरोधात गुन्हा दाखल झाला. यात गुंतवणूकदारांच्या तक्रारी दुपटीने वाढल्या असून, फसवणुकीचा आकडाही 40 लाखांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही. मात्र, संशयित आडगावकरांनी मौजमजा करतानाच महागड्या गाड्या खरेदी करण्यात पैसे उडविल्याची चर्चा शहरात आहे. 

फसवणुकीचा आकडाही 40 लाखांच्या पुढे

आडगावकर सराफ फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे 55 तक्रारी 
आडगावकर सराफ प्रायव्हेट लिमिटेट या सराफी पेढीविरोधात अखेर एमपीआयडी कलमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. सुवर्णसंधी व दूरदृष्टी योजनेच्या नावाखाली आडगावकर सराफी पेढीने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे आतापर्यंत 55 तक्रारदारांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार, सुमारे 40 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक, तर सोन्याचीही फसवणूक केली आहे. शहरातील सराफी व्यावसायिकांकडून 11 महिन्यांसाठी आर्थिक गुंतवणुकीची योजना राबविली जाते. 
11 महिन्यांनंतर सराफांकडून बाराव्या महिन्याची रक्कम टाकून त्या रकमेचे सोने दिले जाते, अशी योजना असते.

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

अखेर एमपीआयडी कलमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

आडगावकर सराफच्या अशाच काही योजनांमध्ये शहरातील शेकडो गुंतवणूकदारांनी आर्थिक गुंतवणूक केली आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमेचा दागिना मिळाला नाही किंवा पैसेही परत मिळाले नाहीत. त्यामुळे या गुंतवणूकदारांनी गेल्या जानेवारी महिन्यापासून वारंवार आडगावकर सराफ दुकानात जाऊन त्याबाबत मागणी केली. मात्र प्रत्येक वेळी आडगावकर सराफांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. मात्र मिरजकर सराफापाठोपाठ आडगावकर सराफी पेढीविरोधातही अखेर एमपीआयडी कलमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: adgaonkar jwellers first generation earned and the second lost nashik marathi news