तब्बल १६० वर्षांनंतर असा अधिकमासाचा योग! सर्वपित्री अमावस्येनंतर धार्मिक विधींना सुरवात 

दत्ता जाधव
Saturday, 19 September 2020

दर चार वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाला हिंदुधर्मीयांत मोठे महत्त्व आहे. यंदा तब्बल १६० वर्षांनंतर लीप इयर आणि आश्विन अधिकमास एकत्र आल्याने या वर्षी आलेल्या अधिकमासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापूर्वी १८६० मध्ये असा अधिकमास आला होता. त्यानंतर असा योग आला आहे.

नाशिक / पंचवटी : दर चार वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाला हिंदुधर्मीयांत मोठे महत्त्व आहे. यंदा तब्बल १६० वर्षांनंतर लीप इयर आणि आश्विन अधिकमास एकत्र आल्याने या वर्षी आलेल्या अधिकमासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापूर्वी १८६० मध्ये असा अधिकमास आला होता. त्यानंतर असा योग आला आहे.

तब्बल १६० वर्षांनंतर लीप इयरमधील अधिकमासाचा योग 

शुक्रवार (ता. १८)पासून १६ ऑक्टोबरपर्यंत अधिकमास आहे.अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याला खूप महत्त्व आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी, जप-तप, होमहवन केले जाते. याशिवाय जावई तसेच भाच्याला वाण देण्याचीही परंपरा आहे. वाण देताना आपापल्या आर्थिक कुवतीनुसार सोने, चांदी, तांब्याच्या वस्तूंचे वाण स्वरूपात दान केले जाते. याशिवाय नवीन कपड्यांनाही महत्त्व आहे. याशिवाय जावईबापूंना अनारशांचा वाण देण्याची परंपरा आहे. सुवासिनींचे प्रतीक असलेल्या पायातील चांदीचे नवीन जोडवे करतात. याशिवाय पूर्वीच्याच चांदीच्या जोडव्यांमध्ये अधिक भर टाकून जोडवे करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपराही आजतागायत टिकून आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

भगवान विष्णूचे आशीर्वाद 
अधिकमासाचे अधिष्ठाता भगवान विष्णू आहेत. त्यामुळे पूर्ण अधिकमास विष्णुदेवतेचा मंत्रजप केल्यामुळे विशेष लाभ होतो, असे सांगितले जाते. असे मानले जाते, की जो भक्त म्हणजेच साधक विष्णू मंत्राचा जप करतो, त्याला म्हणजेच साधकाला भगवान विष्णू स्वतःहून आशीर्वाद देतात. त्यांच्या पापांचे शमन करतात आणि विशेष महत्त्व म्हणजे त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करतात. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

अधिकमासामध्ये भगवान विष्णूच्या मंत्रजपाचे फळ १०० पटीने मिळते, असे सांगितले जाते. अधिकमासात खास ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप केल्यास अक्षय पुण्यफळ प्राप्त होते. -सतीश शुक्ल, अध्यक्ष, गंगा गोदावरी पुरोहित संघ  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adhik maas after 160 years nashik marathi news