कुल नाशिकमध्ये आदिती तटकरेंची बोटींग! आदित्य ठाकरेंनी पाहिली मुंबईतून

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 December 2020

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी (ता.२१) गंगापूर धरणावर उभारलेल्या ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी केली. तसेच येथील बोट क्लब प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी बोटींगचे प्रथम तिकीट काढून तटकरे या बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या.

नाशिक : पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी (ता.२१) गंगापूर धरणावर उभारलेल्या ग्रेप पार्क रिसोर्टची पाहणी केली. तसेच येथील बोट क्लब प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी बोटींगचे प्रथम तिकीट काढून तटकरे या बोटींग पर्यटनाच्या पहिल्या मानकरी ठरल्या. याप्रसंगी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतून (ऑसनलाईन व्हिडिओ) दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून त्यात सहभागी होऊन अदिती तटकरे यांची बोटींग पाहिली. आणि त्या सफरीचा व्हर्च्युअल आनंद घेतला.

शिर्डी पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना माफक दरांत सुविधा द्याव्यात
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ग्रेप रिसॉर्ट येथे आढावा बैठकीत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले कि, नाशिक विभागातील पर्यटनस्थळांचा `एमटीडीसी`च्या माध्यमातून संपूर्ण विकास करावा. त्यात पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा. ती पर्यटनस्थळे लवकरात लवकर पर्यटकांच्या सेवेत आणावीत, अशा सूचना दिल्या. त्या म्हणाल्या, शिर्डी येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासामध्ये पर्यटकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार माफक दरात सोयी, सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासांचा पर्यटक अधिक प्रमाणात लाभ घेवू शकतील.

हेही वाचा >> मित्राच्या बहिणीच्या लग्नाचा तो सोहळा ठरला अखेरचा; जीवलग मित्राची कायमची ताटातूट ​

यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा सिंह नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आषुतोष सलिल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, पर्यटन विभागाचे कार्यकारी अभियंता विनय वावधनी, स्थापत्य अभियंता महेश बागुल, विद्युत विभागाचे अभियंता सतीश चुडे, कनिष्ठ अभियंता रोहित अहिरे, कुलदिप संख्ये आदी उपस्थित होते

हेही वाचा >> चार वर्षाच्या चिमुरड्या 'राई'ने जिंकलं सर्वांचं मन! तीन तास नॉनस्टॉप कळसुबाई सर ​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditi Tatkare boating at gangapur boat club in Nashik marathi news