अखेर रामकुंडावर छट पूजा नाहीच! कोरोनामुळे केली मनाई; घरच्‍या घरी पूजन

अरुण मलाणी
Friday, 20 November 2020

दरवर्षीय गोदा काठ परीसराला यात्रेचे स्‍वरूप प्राप्त होत असते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमिवर पोलिस प्रशासनाने ही पूजा घरीच करण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेकजण सकाळपासून राम कुंडकडे येत होते. परंतु तेथे तैणात पासेलि जवानांनी जमावाला थांबू दिले नाही.

पंचवटी (नाशिक) : उत्तर भारतीयांची छट पूजा यंदा प्रथमच पोलिसांच्या विरोधानंतर रद्द करण्यात आली. या पूजेसाठी शुक्रवारी (ता. 20) सकाळपासूनच उत्तर भारतीय नागरिकांनी गंगा घाटाकडे कूच केली होती. पण मोठ्या संख्येने बंदोबस्ताला असलेल्या पोलिस प्रशासनाने कोणाला नदीपात्रात उतरूच दिले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा पूजेसाठी मनाई करतांना घरीच पूजा करण्याचे आवाहन केले होते.

प्रशासनाने पूजा घरीच करण्याचे आवाहन केले होते

सायंकाळी उशीरापर्यंत रामकुंडावर पूजा होऊ शकली नाही. कार्तिक महिन्याच्या सष्टीला उत्तर भारतीय बांधव सुर्याची उपासना करतात. गत काही वर्षांपासून या पूजेसाठी लाखो भाविक गंगाघटावर जमत असतात. दरवर्षीय गोदा काठ परीसराला यात्रेचे स्‍वरूप प्राप्त होत असते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमिवर पोलिस प्रशासनाने ही पूजा घरीच करण्याचे आवाहन केले होते. तरीही अनेकजण सकाळपासून राम कुंडकडे येत होते. परंतु तेथे तैणात पासेलि जवानांनी जमावाला थांबू दिले नाही.

बरिकॅटींगचा अडथळा

गोदाघाट परिसरातील होळकर पुल ते गाडगे महाराज पूल अशी नदीच्या दुतर्फा पूजेसाठी मोठी गर्दी उसळते. यावर्षी पोलिसांनी रामकुंडकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बरिकेटींग केले आहे. याशिवाय राम कुंडावर ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे पूजेला मज्जाव करत ती घरीच करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मोठ्या संख्येने आलेल्यांना माघारी फिरावे लागले. या पुजेनिमित्त गंगा घाटावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, मात्र पंचवटी पोलिसांनी कालच संबंधिताना नोटिसा बजावत कारवाईचा इशारा दिला होता.

हेही वाचा > संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल

काय आहे छट पूजा

उत्तर भारतीय बांधवांचे हे छट पर्व ४ दिवसांचे असते. कार्तिक शुद्ध चतुर्थीला त्याची सुरवात होते. शष्टीला पूजन करत मावळत्या सूर्याला अर्घ दिले जाते. दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्ध्य दिले जाते. विशेष म्हणजे महिलांबरोबर अनेक पुरुषही हे व्रत करतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After all, there is no Chhat Puja on Ramkunda nashik marathi news