Sakal Impact : VIDEO : अखेर नाशिकमध्ये कोरोना टेस्ट सुरु! प्रत्यक्ष टेस्टिंगला सुरवात..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

नाशिकमध्ये सुरु झालेल्या या लॅबमुळे कमीत कमी वेळात अहवाल प्राप्त होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी ही लॅब महत्वाची ठरेल. चार तासांमध्ये सर्वसाधारणपणे 60 नमुने तपासले जातील. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे इथले उपलब्ध मशीन सुरू होण्यातून चार तासात आणखी 60 चाचण्या होतील. एका दिवसात 240 अहवाल उपलब्ध होतील.

नाशिक : नाशिक आणि मालेगाव मध्ये कोरोना रुग्ण वाढत होते. पण त्याची टेस्ट पुणे अथवा धुळ्याला होत असल्याने नाशिक मध्ये कोरोना टेस्टिंग लॅब व्हावी ही मागणी 'सकाळ'ने लावून धरली. मविप्र च्या डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात आज दुपारी प्रत्यक्ष टेस्टिंगला सुरवात झाली. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लॅबचे अनौपचारिक उदघाटन करण्यात आले

लॅबमुळे कमीत कमी वेळात अहवाल होणार प्राप्त

नाशिकमध्ये सुरु झालेल्या या लॅबमुळे कमीत कमी वेळात अहवाल प्राप्त होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी ही लॅब महत्वाची ठरेल. चार तासांमध्ये सर्वसाधारणपणे 60 नमुने तपासले जातील. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे इथले उपलब्ध मशीन सुरू होण्यातून चार तासात आणखी 60 चाचण्या होतील. एका दिवसात 240 अहवाल उपलब्ध होतील.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  लॅबचे अनौपचारिक उदघाटन करण्यात आले. मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, दातार जेनिटिक्स चे प्रमुख राजन दातार आदी उपस्थित होते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! हळद लागली अन्‌ अक्षता रुसल्या! सप्तपदीच्या फेऱ्यांपूर्वीच नववधूचा संसार उद्‌ध्वस्त

हेही वाचा > धक्कादायक! पिकअप गाडीवर नाव "जय बजरंग बली" अन् आत मात्र अंगावर काटा आणणारी गोष्ट..

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After demand of 'Sakal' Corona test starts in Nashik marathi news