लासलगावात चार दिवसांच्या ब्रेकनंतर कांदा लिलाव पुर्ववत; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अरुण खांगळ
Friday, 30 October 2020

कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आठ हजार रुपयांचा टप्पा लासलगाव बाजार समितीत ओलांडल्याने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर व्यापाऱ्यांना पंचवीस टनापर्यंत निर्बंध घातले होते.

नाशिक/लासलगाव : अखेर आज पाचव्या दिवशी कांदा लिलावाची कोंडी फुटली असुन कांदा साठवणुकीवर 25 टनापर्यंत कांदा व्यापाऱ्यांना निर्बंध घातल्याने नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव गेल्या चार दिवसांपासून बंद होते मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नंतर झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार आज पाचव्या दिवशी कांद्याचे लिलाव लासलगाव येथे पूर्ववत सुरू झाले. त्यामुळे कांदा उत्पादकांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीत 5 हजार 900 रुपये इतका जास्तीतजास्त बाजार भाव जाहीर झाला

एकशे वीस कोटींची उलाढाल ठप्प होती ठप्प 

कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आठ हजार रुपयांचा टप्पा लासलगाव बाजार समितीत ओलांडल्याने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर व्यापाऱ्यांना पंचवीस टनापर्यंत निर्बंध घातले. या निर्णयाबद्दल कांदा व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सोमवारपासून कांदा लिलावात सहभागी न झाल्याने गेल्या चार दिवसांपासून लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते. यामुळे एकशे वीस कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. आज पाचव्या दिवशी लासलगाव सह जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले आहेत. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

6004 रुपये पर्यंत मिळाला भाव

लासलगाव बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे 6 हजार 351 रुपये रुपये इतका जास्तीत जास्त तर लासलगाव बाजार समितीत 5 हजार 900 रुपये इतका जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे. लासलगाव बाजार समिती 306 वाहनातून 3292 क्विंटल कांद्याची आवक झाली त्याला जास्तीतजास्त 6004 रुपये , सरासरी 5501 रुपये, कमीतकमी 1011 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळावा आहे.

 

आति पावसामुळे चाळीत साठवलेला आणि लाल कांद्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे आज मिळणाऱ्या बाजार भावतून फार फायदा होत नसल्याने दिवाळी कशी साजरी करावी आणि नवीन पीक हातात येत नाही तोपर्यंत कुटुंब कसे चालवावे असा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला आहे.- शरद नागरे ,पाचोरे निफाड तालुका, कांदा उत्पादक शेतकरी.

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after four days the onion auction started in Lasalgaon nashik marathi news