Sakal Impact : "साहेब..मला घरी जायचयं" लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर जीवन जगत असलेल्या माऊलीने अखेर सांगितले..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

"वंशाचे दोन-दोन दिवे तरी नशिबी "तिच्या' अंधार' ही बातमी "सकाळ'मध्ये सोमवारी (ता. 20) प्रसिद्ध झाल्यानंतर या महिलेवर ओढावलेल्या प्रसंगामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यातील काहींनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. याबाबत "सकाळ'शी काहींनी संपर्कही साधला. सरकारवाडा पोलिसांना सोमवारी सायंकाळी जुना सीबीएस येथील सिग्नलजवळ ही महिला मिळून आली.

नाशिक : सिडकोतील "त्या' महिलेसंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित महिलेला आम्ही सांभाळतो, असे स्वयंसेवी संस्था चालकांनी सांगितले, तर सरकारवाडा व अंबड पोलिसांनी या महिलेचा शोध घेतला. महिलेने घरी जाते, असे सांगितले. दरम्यान, अंबंड पोलिसांनी महिलेचे घर व मुलाचा शोधार्थ पथक तयार केले आहे. 

"त्या' महिलेच्या पाळतीवर अंबड पोलिसांचे पथक 
"वंशाचे दोन-दोन दिवे तरी नशिबी "तिच्या' अंधार' ही बातमी "सकाळ'मध्ये सोमवारी (ता. 20) प्रसिद्ध झाल्यानंतर या महिलेवर ओढावलेल्या प्रसंगामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यातील काहींनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. याबाबत "सकाळ'शी काहींनी संपर्कही साधला. सरकारवाडा पोलिसांना सोमवारी सायंकाळी जुना सीबीएस येथील सिग्नलजवळ ही महिला मिळून आली. पोलिसांनी तिला वृद्धाश्रमात जाण्याचा पर्याय सांगितला. मात्र त्या महिलेने सिडकोतील घरी जाऊन राहते, असे सांगत ती निघून गेली. दरम्यान, अंबड पोलिसांनी संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिचे घर व तिचा मुलगा काम करीत असलेल्या गॅरेजचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केले आहे. 

हेही वाचा > VIDEO : ह्रदयद्रावक! लॉकडाऊनमध्ये माऊलीच्या नशिबाची दैना..वंशाचे दोन-दोन दिवे असूनही तिचे जीवन रस्त्यावरच!

स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार; महिलेची घरी जाण्याची इच्छा 
"सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त वाचले व त्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा मी पाहिला. पोलिस पथकाने सोमवारी स्मार्ट रोड परिसरात तपास केला असता सायंकाळी जुना सीबीएस येथील सिग्नलजवळ ही महिला मिळून आली. या महिलेशी बोललो असता, तिने वृद्धाश्रमात जाण्यास नकार दिला. मी माझ्या सिडकोतील घरी जाते, असे सांगून ती निघून गेली. - हेमंत सोमवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सरकारवाडा 

"सकाळ'मधील बातमी वाचल्यानंतर आम्ही विशेष पथक तयार केले आहे. या पथकामार्फत त्या वृद्धेच्या मुलांचा शोध घेतला जाईल. त्यातील एक मुलगा गॅरेजमध्ये काम करत असल्याने त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. - कुमार चौधरी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड  

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After sakal news NGO initiatives for woman reached go home nashik marathi news