विनामास्क वावरणाऱ्यांविरोधात मनपा, पोलिसांची संयुक्त मोहीम; आतापर्यंत ६३६ लोकांवर कारवाई

विक्रांत मते
Thursday, 24 September 2020

महापालिका आयुक्त जाधव यांनी मास्क नसलेल्या व्यक्तींवर दोनशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत ६३६ लोकांवर कारवाई करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी महापालिकेच्या पथकाला दाद दिली जात नसल्याने पोलिसांच्या मदतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

नाशिक : कोरोना संसर्गावर जोपर्यंत औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाला स्वतःची व इतरांची काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यासाठी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क बंधनकारक आहे. मात्र शहरात वावरताना बहुतांश नागरिकांच्या तोंडावर मास्क दिसत नसल्याने महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या मदतीने संयुक्त पथक नियुक्त करण्याची घोषणा आयुक्त कैलास जाधव यांनी केली. 

६३६ लोकांवर कारवाई 

शहरात कोरोनाचा फैलाव होत असताना सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांकडून शासन निर्देशांचे पालन होत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त जाधव यांनी मास्क नसलेल्या व्यक्तींवर दोनशे रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत ६३६ लोकांवर कारवाई करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी महापालिकेच्या पथकाला दाद दिली जात नसल्याने पोलिसांच्या मदतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना महापालिकेकडून पत्र लिहिण्यात आले असून, महापालिकेच्या पथकाबरोबर पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली. 

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

पोलिस ठाणेनिहाय पथके तयार करून कारवाई

महापालिकेच्या पथकांसोबत दोन पोलिस कर्मचारी दिल्यास नागरिकांकडून कारवाईला विरोध होणार नसल्याचे पत्रात म्हटले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांबरोबरच दुकानदारांना मास्क, हँडग्लोज वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांनाही ताकीद दिली जाणार आहे. पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पोलिस ठाणेनिहाय पथके तयार करून कारवाई केली जाणार आहे.  

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Against those who not wear masks corporation, joint police operation nashik marathi news