कृषी पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ

अरुण मलाणी
Saturday, 19 September 2020

त्‍यानुसार आता केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी ५ ऑक्‍टोबरला केली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. यादीसंदर्भात तक्रार नोंदणीसाठी ६ ते ८ ऑक्‍टोबरचा कालावधी असेल. तर केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतीम गुणवत्ता यादी ९ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.

नाशिक : राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्‍न पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचा कालावधी वाढविला आहे. त्‍यानुसार ३० सप्‍टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालणार आहे. 

ऑक्‍टोबर अखेरपर्यंत चालणार प्रवेशाची प्रक्रिया 

यासंदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे सूचना जारी केली आहे. त्‍यानुसार कृषी शाखेतील पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला गेल्‍या १० सप्‍टेंबरपासून सुरवात झाली आहे. यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (ता.२१) पर्यंत मुदत दिलेली होती. या मुदतीत वाढ केली असून, इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना आता ३० सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे सुधारीत वेळापत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार आता केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी ५ ऑक्‍टोबरला केली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. यादीसंदर्भात तक्रार नोंदणीसाठी ६ ते ८ ऑक्‍टोबरचा कालावधी असेल. तर केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतिम गुणवत्ता यादी ९ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

पहिली यादी १२ ऑक्‍टोबरला, २ नोव्‍हेंबरला वर्ग होतील सुरू 

पहिल्‍या प्रवेश फेरीच्‍या वाटप यादीची प्रसिद्धी १२ ऑक्‍टोबरला केली जाईल. तर यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी १३ ते १५ ऑक्‍टोबरचा कालावधी मिळणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीच्‍या वाटप यादीची प्रसिद्धी १७ ऑक्‍टोबरला केली जाणार असून, प्रवेश निश्‍चितीसाठी १९ ते २१ ऑक्‍टोबर असा कालावधी मिळणार आहे. यानंतर तिसरी व चौथ्या फेरीची प्रक्रिया पार पडेल. तर २ नोव्‍हेंबरपासून वर्ग सुरू होणार असल्‍याचे सध्याच्‍या वेळापत्रकात नमुद केले आहे.  

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agricultural postgraduate courses Deadline for application is 30th September nashik marathi news