'विरोधी पक्षाच्या अपप्रचाराला शेतकऱ्यांनी बळी पडू नये' - केदा आहेर

विक्रांत मते
Friday, 25 September 2020

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. पीकविमा योजनेतील बदलामुळे ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला.

नाशिक : केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेत पारीत केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांचे फायद्याचे असून, यातून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगली किंमत मिळण्याबरोबरच किमान आधारभूत किमतीला केली जाणारी शेतमाल खरेदी यापुढेही सुरूच राहणार आहे; परंतु विरोधी पक्षांकडून अपप्रचार सुरू असून, त्याला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले. 

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव

भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रवीण अलई, जिल्हा संघटन सरचिटणीस नंदकुमार खैरनार, भूषण कासलीवाल, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, अमोल पवार, योगेश चौधरी, डॉ. प्रशांत गामणे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. पीकविमा योजनेतील बदलामुळे ७७ हजार कोटींची भरपाई मिळाली. डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

बाजाराची स्थिती बघून माल विक्रीसाठी आणता येणार 

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विधेयकाच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आता शेतमाल कोठेही विकता येणार आहे. शेतमाल साठवणुकीची व्यवस्था गावपातळीवर केली जाणार असल्याने यातून बाजाराची स्थिती बघून माल विक्रीसाठी आणता येणार आहे. कंत्राटी शेती ऐच्छिक स्वरूपाची असून, यात हित जपले जाईल. या वेळी जिल्ह्यातील कोरोना काळातील सेवाकार्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सुनील बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture Bill doubles farmers income nashik marathi news