esakal | VIDEO : जेव्हा कृषिमंत्री थेट कोरोनाबाधितांमध्ये शिरतात तेव्हा...अन् मग...
sakal

बोलून बातमी शोधा

corona patients bhuse.jpg

भुसे यांनी फरहान हाँस्पीटलमध्ये जाऊन कोरोनाबाधितांशी संवाद साधल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्यात राजकारण गेलं खड्ड्यात, पण असा अवलिया नेता पाहिला नाही. सरळ मृत्यूच्या दाढेत जाऊन, प्रत्यक्ष मृत्यूशी सामना करणाऱ्या मालेगांवकरांची आस्थेने चौकशी करणारा,त्यांना धीर देणारा. ही राजकारणाची वेळ नाही पण कौतुक तर करायलाच हवं. अशाप्रकारे कौतुकांचा वर्षाव सध्या सोशल मिडियावर होताना दिसत आहे.

VIDEO : जेव्हा कृषिमंत्री थेट कोरोनाबाधितांमध्ये शिरतात तेव्हा...अन् मग...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या येथील फरान, जीवन व मंन्सुरा या रुग्णालयात रविवारी (10) रात्री कृषीमंत्री दादा भुसे व मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी पीपीइ किट घालून प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन कोरोना बाधित रुग्णांची भेट घेत संवाद साधला. त्यांनी रूग्णांची आस्थेवाईकपणे विचारपुस करतांना सोयीसुविधांची पाहणी केली. 

रूग्णांना मोठा आधार व दिलासा
शहरातील फरान हॉस्पिटल येथे मनपाने कोविड रुग्णालयाचे एक युनिट तयार केले आहे. येथे श्री. भुसे यांनीकोरोनाबाधित रुग्णांजवळ जाऊन , त्यांचेशी संवाद साधला आणि विचारपूस करून हितगुज केली. रुग्णांना मिळत असलेल्या सोयी सुविधा व उपचार याची खात्री करत रुग्णांना धीर दिला. कोविड रुग्णालयांमध्ये इतर लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे आजारपणाच्या काळात रुग्णांना आपल्या आप्तांनी भेट दिल्यास एक मानसिक धीर व स्वास्थ प्राप्त होते. मात्र  लोक जाण्यास घाबरतात तसेच त्यांना प्रतिबंध केलेला असतो. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये वेगळी भावना उत्पन्न होऊ नये यासाठी भुसे व कासार यांनी स्वकीयांच्या भावनेतून सर्व कोरोना बाधित रुग्णांची भेट घेत विचारणा केली. यामुळे रूग्णांना मोठा आधार व दिलासा मिळाला.आरोग्यसेवा देणाऱ्यांना हुरूप आला.

हेही वाचा > कृषीमंत्र्यांची प्रार्थना अन् मौनव्रताला मारूतीराया पावणार का? मंदिरात तब्बल तीन तास ठिय्या

राजकारण गेलं खड्ड्यात, पण असा अवलिया नेता नाही. 

भुसे यांनी फरहान हाँस्पीटल मध्ये जाऊन कोरोनाबाधितांशी संवाद साधल्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. त्यात राजकारण गेलं खड्ड्यात, पण असा अवलिया नेता पाहिला नाही. सरळ मृत्यूच्या दाढेत जाऊन, प्रत्यक्ष मृत्यूशी सामना करणाऱ्या मालेगांवकरांची आस्थेने चौकशी करणारा,त्यांना धीर देणारा. ही राजकारणाची वेळ नाही पण कौतुक तर करायलाच हवं. असा मजकूर आहे.

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!