कृषी अधिकारी, सहाय्यक येतात का? कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कृषी सचिव, आयुक्तांनी 15 दिवसांतून एकदा, तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना कृषिमंत्री भुसे त्यांनी केल्या. वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीकविमा योजना, कांदा उत्पादनाबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

नाशिक : शेतकऱ्यांचे प्रश्‍न, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतानाच विविध सूचना जाणून घेण्यासाठी "कृषिमंत्री एक दिवस शेतावर' हा उपक्रम कृषिमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. 13) प्रत्यक्षात अमलात आणला. 

कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का?

\शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी कृषिमंत्री भुसे यांनी प्रोत्साहन दिले. कृषी सचिव, आयुक्तांनी 15 दिवसांतून एकदा, तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशा सूचना त्यांनी केल्या. वळवाडे येथील शेतकरी शांताराम गवळी यांच्या शेतावर जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीकविमा योजना, कांदा उत्पादनाबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी तुमच्याकडे येतात का, अशी विचारणा केली. भुसे यांनी दिवसभरात विविध गावांना भेटी दिल्या. युवा व प्रयोगशील शेतकऱ्यांशी शासकीय विश्रामगृहावर चर्चा केली.

हेही वाचा > गर्भपाताच्या गोळ्या देऊन प्रियकराने चक्क 'तिचा' गर्भपातही केला...त्यानंतर...

घोषणेची आठवड्यातच अंमलबजावणी

नागपूर येथे 7 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या या घोषणेची आठवड्यातच अंमलबजावणी केली. गुरुवारी भुसे यांनी तालुक्‍यातील वळवाडे, अजंग, वडेल, झोडगे आणि माळमाथा भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. 

हेही वाचा > अक्षरशः चक्काचूर! अखेर 'असा' झाला मैत्रीचा दुर्देैवी अंत..

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture minister Dada Bhuse at Farm asking farmers Nashik Marathi News