सुरगाण्यात तब्बल दीड कोटीचा मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

surgana45.jpg
surgana45.jpg

सुरगाणा (नाशिक) : पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ बर्डीपाडा ते सुरगाणा रस्त्याच्या डाव्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये गुरुवारी (ता. २१) टाकलेल्या छाप्प्यात एक कोटी ५१ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्याची ही पहिलीच घटना असल्याने अवैध दारूविक्रीबाबत खळबळ उडाली आहे. 

अशी आहे घटना

याबाबत मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक उषा वर्मा यांच्या आदेशानुसार विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बर्डीपाडा गावच्या हद्दीत महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशासाठी निर्मित व विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला. यामध्ये वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने आयशर टेम्पो (डीएन-०९-एस-९७७४), (डीएन-०९-यू.-९४४८), क्रूझर वाहन (एमएच-४१-सी-६७८२), मारुती सुझुकी (एमएच-०३-एआर-९९१७) असा एक कोटी ५१ लाख ६२ हजार ६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यात गिरीश पवार (वय २३, रा. उंबरठाण, ता. सुरगाणा), हेमंत झांबरू मोरे (२२, रा. बाफळून, ता. सुरगाणा), शैलेश महादू गावित (३०, रा. सातवाकल, ता. धरमपूर, जि. बलसाड, गुजरात) यांना अटक झाली. या कारवाईत निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, एस. व्ही. बोधे, जवान श्री. कांबळे, शेख, नेमाडे, कदम, झिंगडे यांनी सहभाग घेतला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com