लॉकडाऊनमध्ये नशेत महामार्ग पोलिसाने केला 'असा' धक्कादायक प्रकार!

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

सोमवारी रात्री डयुटीवर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, भातुडे, पो. कॉ. शिंदे, कुहाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बिटको चौक येथे डयुटीवर होते. दरम्यान आडगाव येथे नाकाबंदी दरम्यान टाटा कंपनीची नेक्सान चारचाकी गाडी नंबर एम एच 14 जी.वाय 8018 ही थांबवली असता न थांबता तेथून बॅरीकेट तोडून पळून गेली आहे. ही गाडी पुन्हा जेलरोड मार्गी बिटको चौककडे भरधाव वेगाने येत थांबविण्यासाठी हाताने इशारा दिला, पण थांबली नाही

नाशिक : महामार्ग पोलिस वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलिसाने मद्यपान करून महामार्गावरील बॅरिकेड्‌स कारने उडविले. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी कार पकडली असता, संशयिताने पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत, महामार्ग पोलिस ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन केले. 

मद्यपी महामार्ग पोलिसाने केला असा कारनामा
अभिनव अरुण नाईक (38, नेमणूक महामार्ग वाहतूक पोलिस, पिंपळगाव पथक) असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यासह साथीदार रमेश अय्यर, प्रवीण पांडव, चेतन रायकर यांच्याविरोधात नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सोमवारी (ता. 13) रात्री नऊच्या सुमारास टाटा नॅक्‍सन कार महामार्गावरून भरधाव आली. आडगाव नाका येथे लावलेले बॅरिकेड्‌स कारने तोडले. शहर पोलिसांनी या कारचा पाठलाग करीत, बिटको चौक परिसरात नाशिक रोड पोलिसांनी ती पकडली. कारमधील मद्यपी संशयित अभिनव नाईक व त्याच्या सहकाऱ्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत धिंगाणा घातला.  

सोमवारी (ता.१३) रात्री बिटको चौकात बंदोबस्तसाठी असलेल्या पोलीस हवलादार शेख यांच्या अंगावर नशेत चारचाकी चालवणाऱ्या नाशिक ग्रामीण पोलीस नाईकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याबाबत नाशिकरोड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!

गाडी थांबविण्यासाठी हाताने इशारा दिला, पण थांबली नाही
पोलीस हवालदार अल्लाउद्दीन लतिफ शेख, यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सोमवारी रात्री डयुटीवर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, भातुडे, पो. कॉ. शिंदे, कुहाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बिटको चौक येथे डयुटीवर होते. दरम्यान आडगाव येथे नाकाबंदी दरम्यान टाटा कंपनीची नेक्सान चारचाकी गाडी नंबर एम एच 14 जी.वाय 8018 ही थांबवली असता न थांबता तेथून बॅरीकेट तोडून पळून गेली आहे. ही गाडी पुन्हा जेलरोड मार्गी बिटको चौककडे भरधाव वेगाने येत थांबविण्यासाठी हाताने इशारा दिला, पण थांबली नाही पण अंगावर नेत जिवाला धोका होईल असे केले. ती पुढे नाशिकरोड स्टेशन दिशेने जात गाडी वेग कमी झाला यावेळी उपनगर बीट मार्शल व नाशिकरोड पोलिसांनी गाडी पकडून ताब्यात घेतली गाडी चालकास चौकशी केली असता पोलीस नाईक अभिनव अरुण नाईक, पिपळगांव महामार्ग नाशिक ग्रामीण, अशी माहिती दिली. त्याचा तोंडाचा वास येत होता. त्याच्यासोबत रमेश अय्यर, प्रविण पांडव, चंद्रकांत रायकर हे होते. हा मद्यपान करुन गाडी चालवित असल्याचे आढळल्याने पोलीस नाईक अभिनव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcoholic highway police suspension nashik marathi news