कृषिमंत्री म्हणताएत...शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करा!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

शासनाच्या सूचनेप्रमाणे ही संपूर्ण रक्कम खरीप पीक कर्ज वितरणासाठीच वापरावी अशा सूचना बँकेस दिल्या आहेत. बॅंक अधिकारी व सहकार विभागाने समन्वय साधून शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज वाटप करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.१८) येथे केले. 

नाशिक : (मालेगाव) राज्य शासनातर्फे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सन २०१९ अंतर्गत शासनाकडून ८७० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शासनाच्या सूचनेप्रमाणे ही संपूर्ण रक्कम खरीप पीक कर्ज वितरणासाठीच वापरावी अशा सूचना बँकेस दिल्या आहेत. बॅंक अधिकारी व सहकार विभागाने समन्वय साधून शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज वाटप करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता.१८) येथे केले. 

पीक कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा

मालेगाव येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील खरीप हंगाम पीककर्ज वाटप आढावा बैठकीत कृषिमंत्री दादा भुसे यांनी आवाहन केले. भुसे यांनी सहकार विभाग व जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून पीक कर्जाचा आढावा घेतला. तालुक्यातील कर्जमुक्ती योजनेतील १३ हजार ८५८ पात्र शेतकरी खातेदारांना ११६ कोटी ४४ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ही रक्कम प्रथमतः कर्जमुक्ती पात्र खातेदारांनाच पीककर्ज वितरित करून पीक कर्जाचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा. पीककर्ज वाटप कामकाज आठ दिवसाच्या आत पूर्ण करावे असे सक्त आदेश त्यांनी या वेळी दिले. बैठकीत विकास संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्था पातळीवरील अडचणी मांडल्या. त्यात प्रामुख्याने जिल्हा बँकेकडून रोख स्वरूपात रक्कम उपलब्ध करून द्यावी अशी भूमिका अनेकांनी मांडली. 

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ

बँकेच्या सामोपचार योजना संदर्भात चर्चा

बँकेच्या सामोपचार योजना संदर्भात चर्चा झाली. पीककर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. गटसचिवांच्या अडचणी व वेतनाच्या संदर्भातील समस्या श्री. निकम यांनी मांडल्या. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, तालुका उपनिबंधक संगमेश्‍वर बदनाळे, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी डंबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार, सहकार अधिकारी बी. बी. आहिरे, गटसचिव संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ निकम, आदींसह विकास संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील गटसचिव उपस्थित होते. 

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allocate crop loans to farmers immediately - Agriculture Minister Dada bhuse nashik marathi news