आली दिवाळी! घराघरांत फराळ बनविण्यासाठी महिलांची लगबग; अनेकांचा कल तयार फराळाकडेच

diwali-snacks-air-fryer.jpg
diwali-snacks-air-fryer.jpg
Updated on

पंचवटी (नाशिक) : दिवाळीचा पहिला दिवा प्रज्वलित होण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे महिलांची फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. नोकरी-व्यवसायामुळे दिवसभर घरापासून दूर राहणाऱ्या गृहिणींची पसंती तयार फराळालाच असल्याचे दिसून येत आहे. यंदा सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याने दिवाळीची गोडी काहीशी कमी झाली आहे. 

नोकरी-व्यवसायामुळे अनेकांचा कल तयार फराळाकडेच 

दिवाळी म्हटले, की चकली, करंजी, अनारसे, लाडू, चिवडा, शंकरपाळे अशा खमंग पदार्थांचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. तोंडाला चव येणाऱ्या चकलीचे व अनारशाचे तयार पीठ बाजारात उपलब्ध असून, त्यालाही महिलांची पसंती आहे. फराळ तयार करण्यासाठी गृहिणींना पुरेसा वेळही मिळतो. परंतु साधारण पंधरा ते वीस टक्के महिला नोकरी करतात. त्यांना सर्वच पदार्थ घरी तयार करणे शक्य नसते. या वर्गाकडून घरी फराळ बनविण्यापेक्षा तयार फराळाला अधिक पसंती दिली जाते. मेन रोडवरील विविध ठिकाणी तयार फराळ उपलब्ध आहे. यात चकली २०० रुपये, अनारसे व करंजी २८०, फरसाण, चिवडा, शंकरपाळे १६० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. अलीकडेच नवा ट्रेंड दृढ झाला असून, त्यात तुम्ही संबंधितांकडे फराळासाठी लागणारे साहित्य पोचवायचे असून, विशिष्ट मजुरी घेऊन ते सर्व पदार्थ तयार करून दिले जातात. 

दरांत दहा टक्के वाढ 

कोरोना व अन्य कारणांमुळे या वर्षी सर्वच वस्तूंच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. यात वनस्पती तूप १२० रुपये, पोहे ८० रुपये, शेंगदाणे १२०, मैदा, रवा ३६, पिठीसाखर ५०, डाळ्या शंभर रुपये किलोप्रमाणे उपलब्ध आहेत. याशिवाय चकलीचे तयार पीठ १८० रुपये तर, अनारशांचे पीठ १२० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. 

रांगोळी, रंगांना मागणी 

बाजारात रांगोळीबरोबरच वेगवेगळे आकर्षक रंगही विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रांगोळी व रंग घेण्यासाठी मेन रोडला झुंबड उडत आहे. कधीकाळी महिलांवर्गात लोकप्रिय असलेली ठिपक्यांची रांगोळी हा प्रकार आता कालौघात मागे पडला आहे. त्याऐवजी महिलांची पसंती बाजारात उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या ठशांना आहे. रांगोळी दहा ते पंधरा रुपये किलो दराने, तर विविध आकारांतील ठसे वीस रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. चित्रमंदिर चित्रपटगृहामागे होलसेल व किरकोळ दरात रांगोळी व रंग उपलब्ध असून, त्याठिकाणी महिलांची झुंबड उडाली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com