थरारक! कोविड सेंटरहून परतणारी १०८ रुग्णवाहिका पलटी; ग्रामस्थांच्या काळजाचा चुकला ठोका

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

सायंकाळची वेळ.. मटाणे गावाजवळून १०८ रुग्णवाहिका कोवीड सेंटरहून परतत होती. पण त्यानंतर या रुग्णवाहिकेबाबत अशी बातमी येताच साऱ्यांचाच काळजाचा ठोका चुकला. असे काय घडले वाचा...

नाशिक / देवळा : सायंकाळची वेळ.. मटाणे गावाजवळून १०८ रुग्णवाहिका कोवीड सेंटरहून परतत होती. पण त्यानंतर या रुग्णवाहिकेबाबत अशी बातमी येताच साऱ्यांचाच काळजाचा ठोका चुकला. असे काय घडले वाचा...

अनर्थ होता होता...

याबाबत सविस्तर वृत्त असे की , मंगळवारी (दि. १५) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कळवण कडून देवळयाच्या दिशेने येत असताना मटाणे ता. देवळा येथे १०८ रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात रुग्णवाहिका चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही रुग्णवाहिका कोरोना रुग्णाला कोविड सेंटरला दाखल करून परत येत असतानाच हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली असून अपघाताचे कारण समजू शकले नाही. मात्र या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ती रिकामी असल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

अपघाताची तक्रार दाखल

देवळा पोलिसांनी मोटर अपघाताची तक्रार दाखल करून घेतली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.ही रुग्णवाहिका रिकामी असल्याने पुढील अनर्थ टळला असून, चालक किरकोळ जखमी झाला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambulance accident at matane nashik marathi news