भाजप आमदारांच्या मागणीवर का भडकले मालेगावकर? हे आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

आम्हालाही नको तुमचा संपर्क, आम्ही वाचवू स्वत:ला... जय मालेगाव, जय मालेगावकर' म्हणत नेटकऱ्यांनी आमदार यांना ट्रोल करतानाच, "मालेगाव तालुक्‍यातील निमगावच्या आपण सूनबाई आहात' हे विसरू नका, असा सल्लाही दिला. 

नाशिक : ताई आम्हालाही चांगल्या वैद्यकीय सुविधा हव्या आहेत. मालेगावला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना टेस्टिंग लॅबची गरज निर्माण झाली; परंतु लॅब नाशिकला दिली गेली. आमच्या मालेगावलाही सुविधा द्या. येथील रुग्ण नाशिकच नव्हे, तर राज्यातल्या कुठल्याही शहरात जाणार नाहीत. भाजपच्या शहरातील सर्वच आमदारांनी मालेगावचे कोरोना रुग्ण नाशिकमध्ये आणण्यास विरोध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मालेगावकर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियांचा मारा केला.

ताई... आम्हालाही चांगल्या सुविधा नको का? 

विशेषत: आमदार हिरे यांना लक्ष करताना इतर शहरांप्रमाणे मालेगावमध्ये कायमस्वरूपी उपाय शोधला गेला नसल्याची खंत व्यक्त केली. "मालेगावमध्ये सुविधा नसल्याने नाशिकला लोक जातात. मालेगावमध्ये आम्हालाही चांगली ट्रीटमेंट नको का? जिल्हा म्हणून नाशिकला सर्व सुविधा ठेवतात; परंतु आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्‍चर असूनही अडचणी निर्माण केल्या जातात. मालेगावला कायम दुय्यम वागणूक दिली जाते. तुटपुंजे कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून आमच्याकडे पाठविले जाते; परंतु सीमाताई, आम्ही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहोत. आम्हालाही नको तुमचा संपर्क, आम्ही वाचवू स्वत:ला... जय मालेगाव, जय मालेगावकर' म्हणत नेटकऱ्यांनी आमदार हिरे यांना ट्रोल करतानाच, "मालेगाव तालुक्‍यातील निमगावच्या आपण सूनबाई आहात' हे विसरू नका, असा सल्लाही दिला. 

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

मालेगावकर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया 
सोशल मीडियावरील टीकेमागे पश्‍चिम मतदारसंघातील विरोधक आहेत. सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांच्या मागणीनुसारच आमदार म्हणून भूमिका घेतली. नाशिक जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड नाही. त्याशिवाय रुग्णांची हेळसांड होण्याची भीती अधिक आहे. मालेगावलाच अधिक सुविधा पुरविल्या, तर तेथील सुविधा भक्कम होतील हा त्यामागचा उद्देश आहे. - सीमा हिरे, आमदार, पश्‍चिम मतदारसंघ  

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Angry reaction of Malegaonkar netizens on the demand of BJP MLAs nashik marathi news