महापालिकेबाबत सोशल मीडियावर अफवांचा सुळसुळाट; दक्षता घेण्याचे आयुक्तांचे आवाहन

विक्रांत मते
Friday, 25 September 2020

महापालिकेच्या वतीने शासन निर्देशानुसार माझे कुटुंब माझे जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षण डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे.

नाशिक :  सध्या राज्यात माझे कुटूंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत शहरात घरोघरी जाऊन आरोग्य सेवकांमार्फत कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी मोहिम राबवण्यात येत आहे.  दरम्यान महापालिका राबवत असलेल्या  'माझे कुटूंब माझी जबाबदारी' या शासनाच्या उपक्रमाबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविली जात आहे.  

महापालिकेच्या वतीने शासन निर्देशानुसार माझे कुटुंब माझे जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षण डॉक्टर, नर्स, अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांमार्फत करण्यात येत आहे. त्याबद्दल सोशल मिडीयावरील संभ्रम निर्माण करणारे संदेश पाठवले जात आहेत. अशा संदेशाला बळी न पडता घरी येणाऱ्या महापलिका कर्मचायाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

आयुक्तांचे अवाहन

सकाळी ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्वेक्षण होणार असून त्यासाठी महापालिकेचे कर्मचारी कार्यरत राहणारआहे.नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. परंतू सध्या सोशल मीडियावर एक संदेश नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत असून नागरिकांनी अफवांना बळी न पडता आपल्या घरी येणाऱ्या महापलिका कर्मचायांना सहकार्य करून माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण शहराकरिता पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An appeal to care about rumors nashik marathi news