सचिन पाटील नाशिकचे नवे पोलीस अधीक्षक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज रविवारी (ता. 20) रोजी सकाळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पदाचा कार्यभार स्वीकारला. या आधी ते मुंबई येथील राज्य राखीव दलात समादेशक म्हणून कार्यरत होते.

नाशिक : नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज रविवारी (ता. 20) रोजी सकाळी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पदाचा कार्यभार स्वीकारला. या आधी ते मुंबई येथील राज्य राखीव दलात समादेशक म्हणून कार्यरत होते.

पोलीस अधीक्षक पदी सचिन पाटील यांची नियुक्ती

शनिवारी (ता. 19) रात्री उशिरा राज्यातील 36 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या गृह विभागाने काढले आहेत. यापूर्वीच्या नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांची नुकतीच अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली होती. सचिन पा़टील यांच्या नियुक्तीने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाला तरुण चेहरा मिळाल्याने जिल्हयातील गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आता जिल्हावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहे. काल रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमिताभ गुप्ता हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. विनीत अगरवाल प्रधान सचिव गृह (विशेष) हे जागा संभाळणार आहे. डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

श्री पाटील यांनी २०११ मध्ये राज्यपालांचे एडीएस म्हणुन काम केले आहे. यांनतर २०१५ ला ठाणे शहर पोलीस उपायुक्त, २०१७ ला मुंबई पोलीस उपायुक्त तर २०१९ पासून आतापर्यंत मुंबई राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणुन कार्यरत होते. शनिवारी समादेशक पदाचा पदभार देऊन ते सायंकाळीच तात्काळ नाशिकला हजर झाले. रविवार असल्याने ते सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी रविवारी सकाळीच आडगाव मुख्यालय येथे हजर होत पदभार स्विकारला. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Sachin Patil as Nashik Rural Superintendent of Police nashik marathi news