निफाडला परदेशी पक्ष्यांचे आगमन; पक्ष्यांच्या गुंजणाऱ्या तराण्याने निफाडकर मंत्रमुग्ध 

माणिक देसाई
Monday, 9 November 2020

यंदाच्या लांबलेला पाणकाळा यामुळे हिवाळा उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या आगमनाला उशीर झालेला असताना नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशीविदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे.

नाशिक/निफाड : गोदावरी, कादवा, विनता या नद्या आणि काठोकाठ भरलेले जलाशय, तसेच जवळच आसलेले नांदुरमध्यमेश्वर धरण यामुळे निफाड शहर आणि परिसर देशीविदेशी पक्ष्यांचे हक्काचे आश्रयस्थान बनले आहे. पक्षी अभयारण्यासह निफाड शहरातील वृक्षांवरही अनेक परदेशी पाहुणे मुक्काम करत असून, सकाळी, सायंकाळी विविध पक्ष्यांचे गुंजणारे तराणे निफाडकरांना मंत्रमुग्ध करत आहेत. 

यंदाच्या लांबलेला पाणकाळा यामुळे हिवाळा उशिरा सुरू झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या आगमनाला उशीर झालेला असताना नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशीविदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे थवे नांदुरमध्यमेश्वर धरण आणि गोदावरीसह तिच्या उपनद्या आणि बंधारे यांच्या जलाशयावर थांबत आहे. 
यात प्रामुख्याने राँबीन, बुलबुल, गप्पीदास, वटवट्या, मैना, साळुंखी, रोझीपास्टर, नाचन, वटवाघुळ, सुतार, हुदहुदे, ब्रावून, थ्रेशर, बंटीग, कुदळे, पाकोळी, जांभळी पाणकोंबडी, आयबीज, भारद्वाज, पिंगळ यांच्यासह शेकडो प्रजातीचे पक्षी आपल्या गुंजनातून मंत्रमुग्ध करताना सध्या दिसत आहेत. सध्या या सर्वांमध्ये रोझी पास्टर (गुलाबी मैना) यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

निफाड परिसरात महिनाभर उशिरा गुलाबी थंडीचा माहोल तयार झाला आहे. यंदा भरपूर पाऊस झाला आहे. गोदावरी आणि तिच्या उपनद्या, बंधारे काठोकाठ भरल्याने उशिराने का होईना पक्षी हंगाम सुरू झाला आहे. हजारो देशविदेशातील पक्ष्यांचे थवे शहर परिसरात डेरेदाखल झाले आहेत. 
-राहुल वडघुले, पक्षीमित्र निफाड 
 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrival of native and exotic birds at Niphad nashik marathi news